काही केल्या झोप येत नाहीये? US Navy चा 'हा' Formula वापरुन पाहा, क्षणात डोळा लागेल

सध्याच्या घडीला मला झोप येते असं म्हणणाऱ्यांपेक्षा मला झोप येत नाही असंच म्हणणारे जास्त आहेत. तुम्हीही त्यातलेच आहात का? 

Updated: Sep 26, 2022, 12:13 PM IST
काही केल्या झोप येत नाहीये? US Navy चा 'हा' Formula वापरुन पाहा, क्षणात डोळा लागेल  title=
How to sleep within 2 minutes Read about this unique america us navy formula

How to sleep within 2 minutes : आहाराच्या बिघडलेल्या सवयी (Diet Habits), व्यायामापासूनचा दुरावा आणि असंतुलित जीवनशैलीमुळं सध्या सर्वच वयोगटांमध्ये काही समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. यामध्ये निद्रानाशाची समस्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सतत मोबाईलमध्ये डोकावत राहणं, रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं या सवयींमुळे झोपेचं प्रमाण कमी होतं. शिवाय मधुमेह (Diabities), हृदयरोग (Heart Issues) अशा समस्याही डोकं वर काढतात. 

कितीही प्रयत्न करुनही झोप येत नाही, असं म्हणणाऱ्यांमध्ये तुम्हीही आहात का? कसलीही गोळ्या, औषधं घेण्याची गरज नाही. कारण, आता अवघ्या दोन मिनिटांत झोप यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त एक Formula तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. (How to sleep within 2 minutes Read about this unique america us navy formula)

अधिक वाचा : तुम्हालाही रात्री 2- 3 वाजता जाग येते? पाहा त्याविषयी ज्योतिष काय सांगतं

अधिक वाचा तुम्हालाही रात्री 2- 3 वाजता जाग येते? पाहा त्याविषयी ज्योतिष काय सांगतं

 

US च्या सैनिकांशी काय आहे कनेक्शन? 
 1981 मध्ये 'रिलॅक्स अँड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मेंस' अमेरिकेचे सैनिक (America) लवकर झोप येण्यासाठी नेमकं काय करतात यावरून पडदा उचलण्यात आला होता. सैनिकांच्या झोपेसाठी ही तरतूद त्यावेळी करण्यात आली होती जेव्हा त्यांची कामगिरी ढासळू लागली होती. थकवा आणि कमी झोपेमुळं त्यांच्या चुका वाढत होत्या. 6 आठवड्यांच्या परीक्षणानंतर 96 टक्के प्रकरणांच्या बाबतीत ही पद्धत फायद्याची ठरली. 

अवघ्या 120 सेकंदांची जादू 
हे तंत्र इतकं कमाल आहे की तुम्हाला अवघ्या 120 सेकंदांत म्हणजे दोन मिनिटांत झोप येईल. यामध्ये काही सर्वसाधारण कवायत प्रकारांचा समावेश आहे. त्यासाठी नेमकं का करावं पाहा... 

1. जीभ, जबडा आणि डोळ्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या मांसपेशींसहित चेहऱ्याच्याही मांसपेशींना आराम द्या. 
2. उपडं झोपून खांदे शक्य तितके जमिनीवर टेकवा. दोन्ही बाजूंना हात Relax करा. 
3. श्वास सोडा आणि छातीला आराम द्या. पायांना आराम द्या.
4. आता डोळ्यांसमोर निळ्याशार पाण्याचा तलाव आहे असं चित्र पाहा आणि त्या विस्तीर्ण आभाळाला न्याहाळत तुमचा डोळा लागतोय असा विचार करा.