उपवास विशेष रेसिपी : रताळ्याचे क्रिस्पी फ्राईज

उपवासाच्या दिवशी नेहमीची साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, थालिपीठ खाऊन तुम्हांला कंटाळा आलाय? 

Updated: Jul 30, 2018, 02:03 PM IST
उपवास विशेष रेसिपी :  रताळ्याचे क्रिस्पी फ्राईज  title=

मुंबई : उपवासाच्या दिवशी नेहमीची साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, थालिपीठ खाऊन तुम्हांला कंटाळा आलाय? मग आता हटके आणि चटपटीत पदार्थांची निवड करा. एरवी रताळ केवळ दहीत किंवा भाजीच्या स्वरूपात खाल्लं जातं. मात्र उपवासाच्या दिवसाव्यतिरिक्तही रताळ खाणं फायदेशीर आहे.  या आरोग्यदायी फायद्यांसाठी करा उपवास!

रताळ्याचे फायदे -

रताळ्यामध्ये कॅलरी आणि स्टार्च सामान्य प्रमाणात असतात. सोबतच सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रेरॉल घटकही कमी असतात. फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंटचा नैसर्गिक स्वरूपात मुबलक साठा असल्याने रताळ आरोग्यदायी आहे. रताळ्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. मग यंदा उपवासाला रताळ्याचे क्रिस्पी  फ्राईज बनवा. उपवास करत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा

कसे बनवाल झटपट रताळ्याचे क्रिस्पी फाईज 

रताळ्याला स्वच्छ धुवून घ्या. हे कंदमूळ असल्याने त्यावर माती अधिक अधिक प्रमाणात असते.

रताळ्याचे उभे उभे पातळ स्लाईस करा.

रताळ्याच्या स्लाईसला मीठ, मसाला, मीरपूड लावा. उपावासाव्यक्तिरिक्त तुम्ही हे फ्राईज करणार असाल तर आलं लसणाची पेस्टदेखील लावू शकता. 

ओव्हन 425 डिग्रीवर प्रिहीट करा.  

बेक होण्यासाठी बेकिंग शीटवर रताळ्याचे काप नीट पसरवून ठेवा. ते क्रिस्पी होईपर्यंत बेक करा. 

सुमारे 35 मिनिटांनंतर हे काप पूर्णपणे बेक होतील. कुरकुरीत फ्राईज खायला तयार आहेत. 

आवडीनुसार, दही, सॉससोबत तुम्ही फ्राईजचा आनंद घेऊ शकता.  

टीप - रताळ्याप्रमाणेच बटाट्याचेही काप बनवले जातात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार रताळ, बटाट्याची निवड करा. 

ओव्हन नसल्यास हे चिप्स तुम्ही गॅसवर तेलात डीप फ्रायदेखील करू शकता.