पालीला घराबाहेर ठेवण्यासाठी मदत करतील घरातील हे '5' पदार्थ

स्वयंपाकघरामध्ये झुरळ आणि पाल या दोघांना बघूनही अनेकांना किळसवाणे वाटते. हेल्दी आणि सुरक्षित आरोग्यासाठी तुम्हांला स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं गरजेचे आहे.  

Updated: Apr 17, 2018, 11:29 AM IST
पालीला घराबाहेर ठेवण्यासाठी मदत करतील घरातील हे '5' पदार्थ  title=

मुंबई : स्वयंपाकघरामध्ये झुरळ आणि पाल या दोघांना बघूनही अनेकांना किळसवाणे वाटते. हेल्दी आणि सुरक्षित आरोग्यासाठी तुम्हांला स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं गरजेचे आहे.  

पाल पाहून तुम्हांला किळसवाणे वाटत असेल तर पालीला केमिकल फ्री पर्यायांनी बाहेर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातीलच काही पदार्थ फायदेशीर ठरणार आहेत. मग पहा कोणते आहेत हे खास पदार्थ झुरळांंना घराबाहेर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील 'हा'च पदार्थ ठरणार फायदेशीर

कांदा 

तुम्हांला घराच्या ज्या भागात पालींचा वावर अधिक आहे असे वाटते अशा ठिकाणी तुम्ही कांदा लटकवून ठेवा. कांद्याचा उग्र वास पालींना लांब ठेवण्यास मदत करते. 

मोरपंख  

भिंतीवर मोरपंख असल्यास तेथे पाली फिरकत नाही. 

लाल मिरचीची पावडर  

घराच्या काना कोपर्‍यात लाल मिरचीची पावडर पसरवून ठेवल्यास, स्प्रे केल्यास पाली दूर होतात. या उपायाने पालींना लांब ठेवण्यास मदत होते.  पाच आजारांवर एक उपाय - मीठ+लिंबू+काळी मिरी

काळामिरी पावडर  

घराच्या भिंतीवर काळामिरीची पावडर स्प्रे करणंदेखील पालींना दूर ठेवण्यास मदत करते. 

लसूण 

कांद्याप्रमाणे लसणाचा उग्र वासदेखील पालींना घरापासून दूर ठेवायला मदत करते. त्यामुळे एखादा लसणाचा कांदा स्वयंपाकघरात लटवून ठेवा. लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर

फिनाईलच्या गोळ्या 

घरात उपद्रवी कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून फिनाईलच्या गोळ्यांचा वापर करू शकता. पण यासोबतच पालींचा घरातील वावर कमी करण्यासाठीदेखील फिनाईलच्या गोळ्या फायदेशीर ठरतात.  

कॉफी पावडर  

घरात विशिष्ट ठिकाणी पाल दिसू नये असे तुम्हांला वाटत असेल तर त्या ठिकाणी कॉफी पावडरसोबत तंबाखू मिसळून ठेवा. या मिश्रणाच्या वासामुळे पाल दूर जाण्यास मदत होते. 

संबंधित आर्टिकल्स - 

या '5' नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांंनी दूर पळवा ढेकणांंचा त्रास