पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या लहानग्यांची काळजी

Monsoon Tips: तापमानातील चढ-उतार आणि थंड आणि ओलसर हवा मुलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशांशी संबंधित संक्रमण तसेच ॲलर्जीक श्वसन विकार होऊ शकतात ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.

सुरभि जगदीश | Updated: Jun 13, 2024, 02:49 PM IST
पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या लहानग्यांची काळजी title=

Monsoon Tips: पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. हवेतील प्रदुषकांच्या वाढीस हे एक प्रमुख कारण ठरत आहे ज्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुल आजारी पडण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे आमच्या मुलांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक होते.

पुण्यातील वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ यांच्या सांगण्यानुसार, पावसाचे घाण पाणी किंवा डबक्यांमध्ये विविध हानीकारक जंतू, जीवाणू, विषाणू आणि कीटकांचे प्रजनन केंद्र बनू शकतात ज्यांच्या संपर्कात मुले घराबाहेर खेळत असताना संसर्ग होऊ शकतो.मुसळधार पावसात जंतूंमुळे पिण्याचे पाणी गलिच्छ आणि दूषित होऊ शकते ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो.

तापमानातील चढ-उतार आणि थंड आणि ओलसर हवा मुलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशांशी संबंधित संक्रमण तसेच ॲलर्जीक श्वसन विकार होऊ शकतात ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.

पावसाळ्यात मुलांमध्ये खालील रोग होण्याचा धोका वाढतो:

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग

यास विविध घटक कारणीभूत ठरतात जसे की उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन किंवा दूषित अन्न, अस्वच्छ परिसरामुळे होणारे पोटाचे आजार. हानिकारक जंतूंच्या संपर्कात आलेले अन्न आणि द्रव पदार्थांच्या सेवनाने अतिसार, ओटीपोटात वेदना होणे, सूज येणे आणि उलट्या होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. अन्न विषबाधा सामान्य आहे म्हणून पुरेशी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

श्वसनसंसर्ग

तापमानात अचानक होणारे बदल श्वसनविकारास कारणीभूत जंतूंचा प्रसार वाढवू शकतात आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात, ज्यामुळे त्यांना श्वसन संक्रमण होण्याची शक्यता अधिक असते. मुसळधार पाऊस वायू प्रदूषणात कारणीभूत ठरताच ज्यामुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. या प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने, मुलांना खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, छातीत घरघर आणि सर्दी यांसारख्या श्वसनाशी संबंधित विविध समस्या येऊ शकतात.

डेंग्यू आणि मलेरिया

विविध घरगुती कारणांसाठी उघड्या डब्यात किंवा बादल्यांमध्ये साठवलेले पाणी हे अनुक्रमे डेंग्यू आणि मलेरियास कारणीभूत असतात तसेच ते एडिस आणि ॲनोफिलीस सारख्या धोकादायक डासांसाठी आश्रयस्थान बनू शकते. हे डास साचलेल्या पाण्यात, डबक्यात आणि फुलांच्या कुंड्या आणि टायरमध्ये साचलेल्या पाण्यात पैदास करतात. मुलांना ताप येणे, जास्त घाम येणे, थंडी वाजून येणे, थकवा येणे, डोळ्यांमध्ये वेदना, त्वचेची जळजळ आणि पुरळ उठणे यासारखी विविध लक्षणे जाणवू शकतात.

पावसाळ्यातील आजारांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी टिप्स

  • मुलांनी पावसाच्या पाण्यात खेळणे टाळावे.
  • डेंग्यू आणि मलेरियाचा धोका कमी करण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा, घराजवळील परिसरात किंवा घरातील भांडी, टायर किंवा ड्रममध्ये पाणी साचू देऊ नका.
  • जीन्स किंवा पॅन्टसह पूर्ण बाह्यांचे टी-शर्ट यासारखे योग्य कपडे घाला, जे डास चावणे टाळू शकतात.
  • रस्त्यावरील अन्न किंवा जंक फूड खाणे टाळा जे बाहेरच्या जागेत तयार केले जाते जे हानिकारक जंतूंमुळे दूषित होण्याची शक्यता असते. त्याऐवजी घरी शिजवलेले ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
  • पालकांनी हे सुनिश्चित करा की आपले मुल संतुलित आहाराचे सेवन करते ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • जंतूसंसर्ग टाळण्यासाठी मुसळधार पावसातून आल्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करा.
  • मुलांना ताप आणि सर्दी झाल्यास स्वत: च्या मर्जीने औषधोपचार करू नका किंवा स्वतःच्या मनाने कोणतेही घरगुती उपाय करून पाहू नका. लक्षणे वाढण्यापुर्वी आपल्या मुलांना डॅाक्टरांकडे घेऊन जा.
  • मुलांना अस्वच्छ हातांनी त्यांच्या डोळ्यांना वारंवार स्पर्श करण्यापासून किंवा चोळण्यापासून रोखा कारण यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.