नकली बदाम कसे ओळखावेत? सणासुदीला गोड पदार्थ करताना घ्या काळजी

Almonds Benefits : बदाम हे आपल्या आरोग्यासाठी फारच चांगले असतात. सोबतच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदाही होता. परंतु अनेकदा बदाम हे खोटेही असू शकतात. तेव्हा अशावेळी आपल्याला खोटे बदाम कसे ओळखावेत हेही समजून घेणे आवश्यक आहे. 

Updated: Nov 3, 2023, 06:38 PM IST
नकली बदाम कसे ओळखावेत? सणासुदीला गोड पदार्थ करताना घ्या काळजी title=

Almonds Benefits : बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात किंबहूना बदाम हे खरे आणि ताजे असणं हे फारच बंधनकारक आहे. रोज बदाम खाण्याचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांनाही बदाम किंवा बदामाचे दूध देण्यात येते. परंतु तुम्ही बाजारात गेल्यावर जर का तुम्हाला नकली बदाम मिळाले तर? अशावेळी खोटे बदाम कसे ओळखावेत हे आपण समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे. सध्या दिवाळीही सुरू होते आहे तेव्हा आपल्या घरी गोडधोड पदार्थ हे तयार होणारच आहेत. अशावेळी आपल्याला बदामाची गरज तर लागणारच आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की खोटे बदाम कसे ओळखावेत. आपल्याला अनेकदा बदाम नीट ओळखता येत नाहीत. तेव्हा यातून जाणून घेऊया की खोटे बदाम हे कसे ओळखावेत. 

अनेकदा हे ड्राय फ्रुट्स खोट्या पद्धतीनं बनविले जातात आणि यात प्रचंड प्रमाणात भेसळ असते. त्यामुळे अनेकदा आपल्याला असं वाटतं की हा बदाम आहे परंतु तो बदामही नसतो. अनेकदा अशावेळी कलर किंवा खोटा रंग लावूनही ड्राय फूड्स खोटे आहेत असाही प्रकार असतो. त्यामुळे अशावेळी आपल्याला अनेक आजारही होण्याची शक्यता असते. तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याचीही अशावेळी काळजी घेणे फार बंधनकारक ठरते. सध्या सणासुदीला आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला अशा गोष्टी लक्षात घेणे हे फारच बंधनकारक आहे. 

हेही वाचा : 'दोन मुलांना एकटा बाप कसा वाढवणार?' घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींना ऐकावे लागले होते टोमणे

  • नकली आणि खरा बदाम ओळखण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात तो घ्या आणि ते थोडे घासा. जर का असं केल्यावर त्यातून रंग बाहेर आला की समजाच हा तुम्ही आणलेले बदाम हे खोटे आहेत. 
  • खऱ्या बदामाचा रंग हा ब्राऊन असतो तर जो निकली आहे त्याचा रंग हा जास्त डार्क असतो. 
  • त्याचसोबत कागदातही बदाम जास्त वेळ दाबून ठेवा जर त्यातून तेल बाहेर आले तर समजा की बदाम हा नकली आहे. 
  • पॅकिंगवरूनही तुम्ही याचा अंदाज बांधू शकता की कशाप्रकारे बदाम हे खोटे असू शकतात. 

आपल्या बदामातून अनेक पोषक घटक मिळतात. त्यातून अशावेळी अनेक दुर्लभ आजारांपासूनही बदाम आपला बचाव करते. त्यामुळे रोज नित्यनियमानं बदाम खाणं हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे आहे.