घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा !

पावसाळ्यामुळे वातावतरणात अल्हाददायक वातावरण निर्माण होते. 

Updated: Jul 2, 2018, 04:53 PM IST
घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा !  title=

मुंबई : पावसाळ्यामुळे वातावतरणात अल्हाददायक वातावरण निर्माण होते. मात्र ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात होणारा बदल आरोग्याला त्रासदायक ठरतो. वातावरणातील बदलामुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास ओषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. 

फायदेशीर ज्येष्ठमध 

प्राचीन काळापासून भारतामध्ये ज्येष्ठमध आयुर्वेदीक उपचारांमध्ये वापरले जाते. आहारात स्वाद वाढवण्यासाठी वापरलं जाणारं ज्येष्ठमध घशातील खवखव कमी करण्यास फायदेशीर ठरते. ज्येष्ठमधामध्ये फायटोकेमिकल्स घटक आढळतात. फ्लैनोनोड्स, चाल्कोन्स, सैपोनिन आणि एक्सनोएस्ट्रोजेन्स या औषधी गुणधर्मामुळे घशातील खवखव कमी होण्यास, आवाज मोकळा होण्यास मदत होते. 

कसा कराल ज्येष्ठमधाचा उपयोग? 

घशातील खवखव कमी करण्यास, छातीमध्ये साठलेला कफ मोकळा करण्यास, हाडांना, मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, तोंड आल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी, केसगळती रोखण्यासाठी ज्येष्ठमध  फायदेशीर आहे. याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा. 

ज्येष्ठमधाचा फायदा ?  

मेंदूला चालना - ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.  

हृद्याचे आरोग्य  - कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 

रोगप्रतिकारशक्ती - शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात. 

हार्मोनल संतुलन - ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 

अ‍ॅन्टी बॅक्टेरियल - शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो. 

अ‍ॅन्टी अल्सर - ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.