नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपाय

प्रदूषण, वातावरणातील धूर, धूळ यासोबतच शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहर्‍यावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण बळावत. 

Updated: Aug 6, 2018, 07:33 PM IST
नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपाय title=

मुंबई : प्रदूषण, वातावरणातील धूर, धूळ यासोबतच शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहर्‍यावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण बळावत. नाकाजवळ तेल ग्रंथी अधिक प्रमाणात असल्याने या भागावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तेलकट त्वचेच्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

कसे दूर कराल ब्लॅकहेड्स ? 

ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक वेळेस महागड्या ब्युटी ट्रीटमेंटची गरज नसते. काही वेळेस घरगुती उपायांनीही ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करता येऊ शकतो. 

बेकिंग सोडा - 

बेकिंग सोड्यामध्ये गुलाबपाणी किंवा साधं पाणी मिसळा. ही पेस्ट नाकावर लावा. किंवा ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्सचा त्रास असेल तेथे ही पेस्ट लावा. पेस्ट सुकल्यानंतर पॅक खेचून काढा किंवा बोटांनी थोडा रगडा.  

चारकोल पॅक - 

अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल आणि त्वचेला पुरक अशा पिल ऑफचं मिश्रण बनवा, चेहर्‍यावर हा पॅक लावल्यानंतर काही वेळ सुकू द्यावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक खेचून काढल्यास रातोरात ब्लॅकहेड्स आणि मृत पेशींचा थर निघून जातो. 

टुथब्रश 

अनेकजण जुने झालेले टुथब्रश फेकून देतात किंवा घरात इतर वस्तू स्वच्छ करायला त्याचा वापर करतात. मात्र नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी टुथब्रश मदत करतो. 

मध आणि साखर 

साखर हे उत्तम स्क्रबर आहे. साखर आणि मधाचं मिश्रण बनवून नाकावर रगडल्याने ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होण्यास तसेच त्वचा मुलायम होण्यास मदत होते.