How to check Purrity of Ghee: तुम्ही खातायत बोगस तूप? अशी ओळखा तुपातील भेसळ

सध्या सातत्याने भेसळयुक्त तुपाबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. एकतर तुपात भेसळ असते किंवा तूप अशुद्ध असतं. असं तूप खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

Updated: Aug 20, 2022, 03:13 PM IST
How to check Purrity of Ghee: तुम्ही खातायत बोगस तूप? अशी ओळखा तुपातील भेसळ  title=

How to check Purrity of Ghee: श्रावणाचा महिना सुरु आहे. येत्या काळात गणपती दसरा, दिवाळी, नवरात्री असा असा मोठा सणाचा सिझन सुरु होणार आहे. या काळात आपल्या घरी विविध प्रकारचं जेवण बनवलं जातं. भारतीय जेवणामध्ये तुपाला प्रचंड असं महत्त्व आहे (Importance of ghee in indian food culture ). सणासुदीच्या दिवसांमध्ये खवा, पनीर, तूप यांसारख्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाणही वाढताना पाहायला मिळतं. अशात तुम्ही विकत घेत असलेलं तूप शुद्ध (Pure Ghee ) आहे की नाही हे जाणून घेण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कशी तपासाल तुपातील शुद्धता? (How to check adultrated ghee)

  • तुपाला चांगलं गरम करा, जर तूप लगेच वितळलं आणि त्याचा रंग बदलून तपकिरी झाला तर तुमचं तूप शुद्ध आहे. जर तुमच्या गरम केलेल्या तुपाचा रंग पिवळा झाला तर त्यामध्ये भेसळ आहे.
  • देशी तूप ओळखण्यासाठी थोडं तूप हातावर घ्या. यानंतर हात उलट करून त्याला जरा रगडा. जर त्या तुपाचे कण झालेत तर समजा तुम्ही विकत घेलेल्या तुपात भेसळ आहे.
  • एक चमचा तुपात चार ते पाच थेंब आयोडिन मिसळा. जर रंग निळा झाला तर त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याची भेसळ आहे.
  • एक चमचा तुपात एक चमचा हायड्रोक्रोलिक ऍसिड आणि चिमूटभर साखर मिसळा. जर रंग लाल झाला तर यामध्ये डालडाची भेसळ आहे.
  • शुद्ध तुपाची ओळख पटवण्यासाठी एक चमचा तूप हातावर घ्या. तूप आपोआप विरघळायला सुरुवात झाली तर ते शुद्ध आहे. जर तूप थिजलं किंवा त्याचा सुवास येणं बंद झाला तर ते भेसळयुक्त तूप आहे. 

बोगस तुपामुळे तुमच्या आरोग्याला धोका

  • भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाल्ल्याने हृदयासंबंधी संबंधित त्रास होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशरचा त्रासही होऊ शकतो. 
  • भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने लिव्हर देखील खराब होऊ शकतं 
  • भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं 
  • भेसळयुक्त किंवा अशुद्ध  तूप खाल्ल्याने मेंदूला सूजही येऊ शकते.
  • भेसळयुक्त किंवा अशुद्ध  खाल्ल्याने पोट बिघडू शकतं, गॅस होऊ शकतो 
  • भेसळयुक्त फॅट्स मिश्रित तुपाने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं 

Disclaimer: सदर लेख हा केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. बातमीतील सत्य असत्यतेबाबत zee24taas पुष्टी करत नाही. सामान्य आईष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)