मुंबई : पुरुष असो की स्त्री, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी, आपण नियमित अंतराने काही मेडिकल टेस्ट केल्या पाहिजेत. वेळच्या वेळी मेडिकल टेस्ट केल्यामुळे तुम्हाला शरीरातील एकंदरीत आरोग्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येतो.
अनेकदा महिला असा विचार करतात की 20 ते 30 वयोगटामध्ये त्यांना कोणताही गंभीर आजार होणार नाही. मात्र असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. या वयात महिला त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतात त्यावर त्यांच्या भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 20 ते 30 वयोगटातील महिलांनी खाली दिलेल्या टेस्ट करून घेतल्याच पाहिजेत.
राष्ट्रीय आरोग्य पोर्टलनुसार, महिलांनी आपल्या शरीराचं वजन दररोज मोजलं पाहिजे. आपला बॉडी मास इंडेक्स निरोगी असावा नाहीतर आपण भविष्यात बर्याच रोगांचे बळी होऊ शकता.
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हृदयरोगाच्या आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच स्त्रियांनी नियमित रक्तदाबाची तपासणी करत रहावे.
नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेची कोलेस्ट्रॉल चाचणी करून घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य पोर्टल दर पाच वर्षांनी एकदा कोलेस्ट्रॉल तपासणीची करण्याचा सल्ला देतं.
तज्ञांच्या मते, आपण ब्रेस्ट एक्झाम आणि पेल्विक तपासणी करून भविष्यात कॅन्सर आणि वंध्यत्वाचे जोखीम कमी करू शकता. त्याच वेळी, असामान्य पॅपच्या इतिहास असेलल्या महिलांना डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे पॅप स्मियर चाचणी घ्यावी. तर सामान्य स्त्रियांनी दर 3 वर्षांनी पॅप स्मियर चाचणी करून घ्यावी.