World No Tobacco Day 2019: अशी घालवा तंबाखू, सिगारेटची घातक सवय

तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज

Updated: May 31, 2019, 02:12 PM IST
World No Tobacco Day 2019: अशी घालवा तंबाखू, सिगारेटची घातक सवय title=

मुंबई : गुटखा, सिगारेट, सिगार, हुक्का या सगळ्यामध्येच तंबाखूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकांना सिगारेट, तंबाखू सतत घेण्याची सवय लागलेली असते. ही सवय इतकी वाढली जाते की अगदी तासा-तासाला तंबाखू, सिगारेट लागते. याचा शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. कॅन्सर, तोंडाचा अल्सर यांसारखे आजारही होतात पण तंबाखू खाणं सुटत नाही. 

आज जगभरात World No Tobacco Day साजरा केला जात आहे. अनेकांना तंबाखू सोडण्याची इच्छा असते पण याची इतकी सवय लागलेली असते की, कितीही प्रयत्न केले तरी खाण्याची इच्छा होते. तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज असते. सिगारेट, तंबाखू सोडण्याचा निर्णय घ्या आणि स्वत:वर नियंत्रण ठेवा. 

काही लोक स्वत: सिगारेट  ओढत नाही परंतु दुसऱ्यासोबत उभे राहतात. जेव्हा धुम्रपान करणारा धूर सोडतो तेव्हा तो धूर सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या नाक आणि श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात जातो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुलनेने धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला या धूराचा अधिक त्रास होतो. 

सिगारेट, तंबाखू सोडण्यासाठी स्वत:चा स्वत:वर कंट्रोल असणं आवश्यक आहे. तंबाखू, सिगारेटची सवय सोडण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतात. 

च्विंगम सिगारेट दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे. 

थकवा किंवा तणावामुळे अनेकांना सिगारेट पिण्याची इच्छा होते. ज्यावेळी सिगारेट पिण्याची इच्छा होते त्यावेळी योग करावा. योगाचे काही सोपे उपाय मन शांत करते आणि सिगारेट पिण्याची इच्छा कमी होते.

सिगारेटची इच्छा झाल्यास ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीन टी पिण्याने सिगारेट पिण्याची इच्छा कमी होते. 

बडिशोप तूपात टाकून तव्यावर सुकवा. सिगारेट, तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास ती बडिशोप खावी त्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होत नाही. 

विटॅमिन सीयुक्त फळं खावी. संत्री, आवळा, सफरचंद, पेरु यांसारख्या फळांमुळे या सवयीपासून सुटका होते. विटॅमिन सी शरीरातील निकोटिन डिटॉक्स करण्यासाठी तसंच तलफ कमी करण्यासाठी मदत करतात.

दालचीनी सोबत ठेवा. तंबाखू, सिगारेटची इच्छा झाल्यास दालचीनी खाण्याने फायदा होतो. 

फ्लेवर्ड टूथपिकचा वापर करु शकता. टूथपिकचा स्वाद तोंडात बराच वेळ राहतो त्यामुळे सिगारेट पिण्याची इच्छा होत नाही.