मुंबई : ऑफिसमध्ये अनेकजण तासन तास एकाच स्थितीमध्ये बसतात. तुमच्या बसण्याच्या स्थितीवरून तुमच्या बॉडी लॅग्वेंजबद्दल काही संकेत मिळतात. तसेच या स्थितीवरून तुमच्या आरोग्यावरही काही परिणाम होत असतात.
क्रॉस लेग म्हणजेच पायांवर पाय ठेवून बसण्याची काहींना नकळत सवय असते. मात्र याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? क्रॉस लेग स्थितीत बसल्यामुळे मांसपेशींना नुकसान होते. केवळ पाय नव्हे तर मान आणि पाठीवरदेखील त्याचा दबाव येतो. सुमारे 60% महिला अशा स्थितीत बसतात. म्हणूनच या स्थितीत बसल्याचे दुष्परिणाम जाणून घ्यायलाच हवे.
क्रॉस लेग स्थितीमध्ये बसल्याने रक्तदाबावर परिणाम होतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल जेव्हा डॉक्टर रक्तदाब तपासतात तेव्हा हात-पाय पसरून बसायला सांगतात. आरामदायी स्थितीमध्ये ते तुमची चाचणी करतात. 'बीपी लो' झाल्यास घरगुती उपचार
एकाच स्थितीमध्ये फार काळ बसल्याने पाय सुन्न होण्याची शक्यता असते. क्रॉस लेग स्थितीमध्ये बसल्याने गुडघ्याच्या मागील नसांवर दाब येतो. कोणत्याही स्थितीत फारकाळ बसलात तरीही त्याचा आरोग्याचा परिणाम होतो. असा त्रास तुम्हांला जाणवत असल्यास मसाज करा.
नेहमी क्रॉस लेग स्थितीमध्ये बसणार्यांमध्ये पाठीचे आणि मानेचे दुखणे वाढते. या स्थितीत बसल्याने मणक्यावर दाब येतो. यामुळे दुखणे वाढते.
वेरिकोज वेन्सचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. या त्रासामध्ये पायाच्या नसांमध्ये सूज वाढते. सतत उभं राहिल्याने जसा त्रास होतो तसाच हा त्रास क्रॉस लेग स्थितीमध्ये अधिक काळ बसल्यानेही हा त्रास बळावू शकतो. मात्र वैद्यशास्त्रात याबाबत अजूनही मतभेद आहेत. या '5' सवयी वाढवतात 'व्हेरिकोज व्हेन्स'चा धोका ...
फार काळ पाय क्रॉस लेग स्थितीमध्ये ठेवल्यास आरोग्याला ते नुकसानकारक ठरते. यामुळे पेरोनेल नर्व पाल्सीचा त्रास बळावू शकतो. यामुळे पायाच्या बोटांची नीट हालचाल करणंदेखील कठीण होते. सतत पाय हलवण्याची सवय देते 'या' आजाराचे संकेत ...