मुंबई : एड्स हा असा रोग आहे ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू संभवतो. एड्स कोणत्याही वयात होऊ शकतो. एड्स हा व्यक्तिचं संपूर्ण शरीर हळूहळू निकामी करतो. महत्वाचं म्हणजे या रोगावर अजून कोणत्याही देशात औषध सापडलेलं नाही. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की एड्स कसा आणि कधी होतो.
एड्स कसा होतो?
एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.
एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यानंतर संपूर्ण शरीरात पोहचण्यासाठी त्याला 10 वर्ष लागतात. हा व्हायरस आणखी कमी दिवसांमध्ये पण शरीरात पसरू शकतो. वयानुसार तो शरीरात पसरतो.
निरुत्साही आणि सारखं थकल्या सारखं वाटणे, शरीरात दुखणं, उलटी होणं ही एड्सची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर लगेचच रुग्णालयात जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे