मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मग त्यावर उपाय म्हणून बाजारात मिळणारी ‘अॅन्टासिड्स’ घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण वारंवार अॅन्डासिड घेणेही आरोग्याला त्रासदायक ठरते. अशावेळेस पित्ताचा त्रास आटोक्यात ठेण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहे.
संतुलित आहार, व्यायाम आणि झोपण्याच्या वेळा पाळल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. मात्र तुम्हांला वारंवार हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सौम्य स्वरूपातील पित्त्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी कोरफड हा उत्तम आणि सुरक्षित घरगुती उपाय आहे.
पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी ‘कोरफ़ड’ अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड रेचक असल्याने बद्धकोष्ठता, पोटातील अल्सर, जळजळ कमी होण्यास मदत होते.
कोरफडीचा गर
ताक
कृती –
कोरफडीची पात कापून स्वच्छ धुवून घ्यावे.
पात मधून कापून त्यातील गर काढून घ्यावा. हा गर धुवून त्यावरील पिवळा भाग काढून घ्यावा.
दोन चमचे कोरफडीचा गर ताकात मिसळून अंदाजे 20 मिली मिश्रण बनवावे.
योग्य मात्रा
हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदा होतो.