या ४ घरगुती उपायांनी मिळवा केसांतील खाजेपासून सुटका!

डोक्यात येणारी खाज अगदी हैराण करुन सोडते.

Updated: Jun 5, 2018, 09:20 AM IST
या ४ घरगुती उपायांनी मिळवा केसांतील खाजेपासून सुटका! title=

मुंबई : डोक्यात येणारी खाज अगदी हैराण करुन सोडते. त्यामुळे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. उन्हाळ्यात घाम, चिकचिकीतपणा यामुळे ही समस्या अधिक वाढते. तर पावसाळ्यातही पावसाच्या पाण्यामुळे उद्भवणारी कोंड्याची समस्या डोक्यातील खाजेला आमंत्रण देते. डोक्यात खाज येण्याची अनेक कारणे असली तरी केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळे ही समस्या अधिक वाढते. तर जाणून घेऊया त्यावरील घरगुती उपाय...
केसांची मुळे कोरडी राहील्याने खाज तर येतेच त्याचबरोबर कोंड्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण कोंड्याची समस्या वाढल्यास मायक्रोबियल इंफेक्शन होऊ शकते. म्हणून स्काल्प कोरडे राहू देऊ नका.

टी ट्री ऑईल

सुंदरता वाढवण्यासाठी जगभरात टी ट्री ऑईलचा वापर केला जातो. याच्यात टरपीन्स नावाचे घटक असते. त्यामुळे अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुण असतात. त्यामुळे केसातील खाजेपासून सुटका मिळते. २ चमचे टी ट्री ऑईलमध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावून मसाज करा. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

कोरफड

कोरफड बहुगुणी आहे. केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफड अतिशय उत्तम ठरते. कोरफडीचा वापर केस सुंदर, मजबूत आणि डॅंड्रफ फ्री होण्यासाठी होतो. कोरफड जेलने केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

अॅपल व्हिनेगर

डोक्यातील घाग साफ करण्यासाठी याचा खूप वर्षांपासून उपयोग होत आहे. पाऊण कप पाण्यात पाव कप अॅपल व्हिनेगर घालून केसांना मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लिंबू आणि मध

लिंबात अॅँटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाच्या रसात मध मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा आणि १५ मिनिटांनी केस धुवा. कोंडा, खाजेच्या समस्येपासून सुटका होईल.