उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? मग घरच्या घरी घालवा चेहऱ्यावरील टॅनिंग

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्हाला 5 सोप्या स्टेप्स सांगणार आहोत

Updated: May 5, 2022, 02:12 PM IST
उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? मग घरच्या घरी घालवा चेहऱ्यावरील टॅनिंग title=

मुंबई : सध्याच्या कडक उन्हात आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो, खासकरून आरोग्याची. मात्र या उन्हात तुम्ही त्वचेचीही काळजी घेता का? उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्याची त्वचा टॅन होण्याची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. तुम्ही फेशियलच्या मदतीने त्वचेवरील टॅनिंग काढून टाकू शकता. 

मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्हाला 5 सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

पहिली स्टेप- कच्च्या दुधाने चेहरा साफ करा

  • टॅन काढून टाकण्याची पहिली स्टेप म्हणजे चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणं
  • त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कच्चं दूध वापरू शकता
  • कच्च्या दुधामुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेत साचलेली घाण निघून जाते
  • कच्चं दूध कापूस दुधात बुडवून घ्या आणि त्यानंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.
  • तुम्ही सर्कुलर मोशनमध्ये कच्चं दूध चेहऱ्यावर लावून आणि कापसाने स्वच्छ करून चेहरा स्वच्छ करा

दुसरी स्टेप- त्वचेला एक्सफोलिएट करा

  • दुसरी स्टेपमध्ये त्वचा एक्सफोलिएट करावी लागेल
  • त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही कॉफी आणि साखरेचा वापर करू शकता
  • कॉफी आणि साखर एकत्रित करा, त्यात लिंबाचा रस घाला आणि त्वचेची मालिश करा
  • त्वचेची मालिश करताना चेहऱ्याची त्वचा स्क्रब करा

तिसरी स्टेप- चेहऱ्याला स्टीम द्या

तुमची गरम वाफ द्या, जेणेकरून त्वचेची छिद्रे उघडतात. यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट त्वचेवर लावाल ते योग्य प्रकारे फायदेशीर ठरेल. चेहऱ्याला 10 मिनिटं स्टीम द्या.

चौथी स्टेप- फेसपॅक लावा

  • चौथ्या स्टेपमध्ये त्वचेवर फेसपॅक अप्लाय करा. यासाठी तुम्ही मधाचा उपयोग करू शकता. 
  • मध त्वचेसाठी नैसर्गिक ब्लिच म्हणून काम करतं
  • चेहऱ्यावर मध लावल्यानंतर काहीवेळ चेहरा तसाच ठेवा, जेणेकरून चेहरा मध शोषून घेईल.

पाचवी स्टेप- स्किनला मसाज करा

  • शेवटच्या स्टेपमध्ये तुम्ही चेहऱ्याला मसाज केला. मसाजसाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या मॉईश्चराईजर किंवा फेशियल ऑईलचा वापर करू शकता. 
  • या टीप्सच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते.