मुंबई : मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. म्हणजेच मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आपल्या देशात आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा ताण तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे मधुमेहाचा सामना करावा लागतो. आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. पण त्यामुळे त्रासून जावू नका. खूप चिंता करु नका. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा...
कारल्यात केरोटिन नावाचे रसायन असते. याचा उपयोग नैसर्गिक स्टेरॉयड म्हणून केला जातो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. कारल्याच्या रसात पाणी घालून दिवसातून कमीत कमी तीन वेळा घेतल्यास नक्कीच फायदा होईल.
आवळ्यानेही मधुमेह नियंत्रित आणता येतो. आवळ्यामुळे शरीरातील व्हिटॉमिन सी ची कमतरता भरून काढली जाते. एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज प्या.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कडूलिंबाची काही पाने चावून पाण्यासोबत खा. त्याचबरोबर जांभूळ किंवा गुळवेलीची पाने वाटून खाणे देखील फायदेशीर ठरेल. त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होईल.
मधुमेह असणाऱ्यांनी मध खाऊ नये, असा समज सर्वसामान्यांमध्ये रुढ आहे. मात्र त्यात तथ्य नाही. मधात कार्बोहाइर्ड्रेट, कॅलरी आणि अनेक प्रकारचे मायक्रो न्युट्रीयंट असतात. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
स्वयंपाकात मेथीचा वापर करणे फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. कमीत कमी ५० ग्रॅम मेथीचा उपयोग जरुर करा. नक्कीच फायदा होईल.