High cholesterol: शरीराच्या 'या' भागाची त्वचा कोरडी पडलीये? cholesterol वाढण्याचे संकेत

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात

Updated: Sep 1, 2022, 07:41 AM IST
High cholesterol: शरीराच्या 'या' भागाची त्वचा कोरडी पडलीये? cholesterol वाढण्याचे संकेत title=

मुंबई : हाय कोलेस्ट्रॉलची समस्या 'सायलेंट किलर' म्हणून ओळखली जाते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात जे चांगलं आणि वाईट म्हणून ओळखलं जातं. चांगलं कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तर वाईट कोलेस्ट्रॉल खूप हानिकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. 

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात. त्यामुळे रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात कमी होतो. रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

चुकीची जीवनशैली, अल्कोहोलचं अतिसेवन आणि चरबीयुक्त पदार्थ यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरं जावं लागतं. उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणं क्वचितच दिसत असली तरी त्याची काही चिन्हं आहेत, ज्यावरून उच्च कोलेस्ट्रॉलचा अंदाज लावता येतो.

उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. प्लाक हा कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांनी बनलेला मेणाप्रमाणे पदार्थ असतो. प्लाक जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे धमन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह मर्यादित होतो. 

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने पायातील रक्तप्रवाह थांबतो. त्यामुळे पायांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागतात. क्रिटिकल लिम्ब इस्केमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पायांमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही. यामुळे, तीव्र वेदना, अल्सर किंवा जखमा होण्याचा धोका वाढतो.

NHS च्या मते, क्रिटिकल लिम्ब इस्केमिया (CLI) अत्यंत धोकादायक आणि उपचार करणं कठीण आहे. जेव्हा गंभीर अवयव इस्केमिया होतो तेव्हा याची काही चिन्हे शरीरावर दिसू लागतात. CLI च्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे पायांवर त्वचेचा कोरडेपणा.

मात्र, कोलेस्टेरॉल व्यतिरिक्त, कोरडी त्वचा इतर अनेक समस्यांमुळे होऊ शकते. परंतु CLI सोबत कोरड्या त्वचेसह इतर अनेक संकेत दिसून येतात. CLI च्या इतर लक्षणांमध्ये त्वचेचा पिवळा, गुळगुळीत किंवा चमकदार दिसू लागते.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, ही क्रिटिकल लिम्ब इस्केमियाची लक्षणं आहेत-

पायांमध्ये तीव्र वेदना

पायांची त्वचा फिकट, चमकदार आणि गुळगुळीत आणि कोरडी दिसते.

पायात जखमा आणि अल्सर तयार होणं.

जखम वेळीच भरणं आणि बरं न होणं.

पायांची बोटं सुन्न होणं, तसंच लाल किंवा काळी पडणं.

बोटांमध्ये सूज येणं 

जर तुम्हाला तुमच्या पायात ही चिन्हे दिसली तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.