Clove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत

Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो. 

Updated: Jan 23, 2023, 02:43 PM IST
Clove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत title=

Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Winter Diet Tips) करत असतो. परंतु कोणत्या पदार्थांचे सेवन हे आपल्याला कधीकधी महिती नसते पण तुम्हाला माहितीये का की दूधासोबत जर का तुम्ही लवंगाचे सेवन केलेत तर ते तुमच्या फायद्याचे ठरू शकते. दुध हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. यात प्रथिनं, कॅल्शियम (Calcium), रायबोफ्लेविन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडिन, खनिजे, फॅक्टस, एनर्जी, व्हिटॅमिन ए, डी, के आणि इतर जीवनसत्त्वंही असतात. तर लवंगात प्रथिनं, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक (Zink) आणि कॉपर (Copper) यांचे प्रमाण अधिक असते. 

या मिश्रणाचे फायदे काय आहेत? हे मिश्रण तुम्ही रात्री झोपेच्या वेळी घेऊ शकता. यामुळे तुम्हाला शांत झोप लागते त्याचसोबत तुम्हाला मानसिक शांतीही (Mental Stress) मिळेल आणि ताणही कमी होईल.  दवंग दातासाठी फायदेशीर आहे तेव्हा दुध आणि दवंगाचे मिश्रण हे तुमच्या दातांसाठी फायदेशीर आहे यात तुमच्या तोंडातली दात दुखी (Teeth) कमी होते आणि तुमच्या तोंडातली दुर्गंधीही (Clove) कमी होते. भूक भागवण्यासाठीही दूध आणि दवंगाचा फायदा होतो. 

बद्धकोष्ठतेसाठीही दूध आणि लवंगाचे मिश्रण फायदेशीर आहे. त्याचबरोबर खोकला आणि घसादुखीवरही ते तुम्हाला फायदेशीर ठरते. अनेकदा सर्दीच्या मौसमात आपल्याला सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचे त्रास सुरू होतात तेव्हा आपल्याला दूध आणि लवंग (Clove and Milk) एकत्रितपणे खाणं फायदेशीर ठरेल. 

तेव्हा अशावेळी तुम्ही दूध आणि लवंगाचे एकत्रितपणे सेवन करू शकता. ज्याचा तुम्हाला तुमच्या शरीरासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. तेव्हा जाणून घ्या दुध आणि लवंग एकत्रित बनवण्याची सोप्पी पद्धत नेमकी काय आणि थंडीत तुम्हाला दूध आणि लवंग कशाप्रकारे मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही घरच्या घरी कशी ही पद्धत अवलंबवू शकता. सर्वप्रथम दूध चांगले गरम करा मग त्याच्यात दालचिनीची पूड टाका. मग दूधात लवंगाची पूड मिक्स करा आणि मग त्यात चवीपुरता गुळं आणि मग साखर (Sugar) मिसळा. हे मिश्रण तुम्ही कधीही पिऊ शकता परंतु हे मिश्रण पिण्याची चांगली वेळ म्हणजे तुम्ही रात्री हे मिश्रण घेऊ शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)