तोंडाची चव बिघडलीये? असू शकतात 'या' आजारांचे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका

Health Tips In Marathi: तोंडाची चब बिघडते असं आपण नेहमी ऐकलं असेलच. पण या मुळं एखाद्या आजारांचा धोका असू शकतो हे तुम्हाला माहितीये का? 

Updated: Oct 9, 2023, 01:47 PM IST
तोंडाची चव बिघडलीये? असू शकतात 'या' आजारांचे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका title=
health tips in marathi Which Disease Can Cause Tongue Taste Bud Change

Why Taste Buds Change: जेवण करत असताना अचानक लक्षात येत ही आपल्या तोंडाची चव बिघडलीये. तोंडाची चव बिघडणे हे देखील गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळं तुम्हाला ही स्थिती सामान्य जरी वाटत असेल तरी प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. कारण तोंडाची चव बिघडणे हे गंभीर आजारांचे संकेत देत असतात. खरं तर आजारी पडल्यावर आपल्या जीभेचा स्वाद आणि रंगदेखील बदलतो, त्यामुळं जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा ते सगळ्यात आधी तुमची जीभ तपासतात. 

या आजारांचा असतो धोका

ताप

ताप आल्यानंतर तोंडाची चव बिघडणे हे सामान्य आहे. काहीही खाल्लं तरी चवच लागत नाही. ही एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. मात्र, काही प्रकरणात हे गंभीर आजाराचे लक्षण असून शकते. ते जाणून घेऊया. 

डायबिटीज

मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच चवीत बदल जाणवतो. यामुळं त्यांच्या ब्लड शुगरची मात्रा जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरणे. 

डेंटल प्रोब्लम्स

दातांसंबधी काही विकार असतील तर त्याचा परिणाम चवीवर देखील होतो. गिंगिवाइटिस, कॅव्हिटी किंवा मौखिक अस्वच्छता असल्यास कधी कधी तोंडाची चव बदलू शकते. पण ही एक सामान्य समस्या आहे. 

न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्स

अनेक न्युरोलॉजिकल आजार जसे पार्किंसन डिसीज (Parkinson's Disease), अल्जाइमर्स (Alzheimer's) किंवा मल्टीपल स्क्लेरोसिस (Multipal Sclerosis) या आजारांमध्ये तोंडाची चव बदलू शकते. 

सर्दी आणि खोकला

सर्दी आणि खोकला असेल तर तोंडाची चव बदलू शकते. कारण सर्दीमध्ये नाक बंद होते त्यामुळंच असं घडते. खरतर पदार्थाची चव ठरवण्यासाठी नाक देखील जबाबदार असते.

कोविड-19

करोना व्हायरस संसर्गामुळं संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. जगभरात अनेक जणांचा करोनामुळं मृत्यू झाला होता. करोनामध्येही अनेकांना तोंडाची चव गेल्याचा अनुभव आला होता. हे लक्षण करोना संसर्गाचे महत्त्वाचे लक्षण आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)