Health News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या

Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं. 

Updated: Dec 20, 2022, 06:33 PM IST
Health News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या title=
paan health news

Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं. आपल्याला जरी निमित्त म्हणून पानं खायला आवडतं असलं तरी काहींना पान - सुपारी नित्य नियमानं खायची सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का की पानं खाण्याचे अनेक वाईट परिणामही आरोग्यावर होतात. अनेकदा पानात असलेला चुना, सुपारी आणि अन्य पदार्थांमुळे आपल्या शरीरावर घातक (betel effects on body) परिणाम होण्याची शक्यता असते. तेव्हा पानं रोज खाणं किंवा सारखं सारखं खाणं हे तुमच्या आरोग्याची नासाडी करू शकतं, तेव्हा जाणून घेऊया. रोज पानं खाण्याचे साईड इफेक्ट्स नक्की काय आहेत? (Health Tips Betel Leaf Side Effect Know here before eating Marathi)

अनेक जण फार आवडीनं पान आणि सुपारी खातात. परंतु त्यांना कल्पना नसते की याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. अनेकदा पान खाल्ल्यामुळे खंभीर आजारही होतात. तेव्हा जाणून घेऊया पान खाल्लानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. कुठल्याही गोष्टीच्या फायद्यासह त्याचे असते. तेव्हा पान खाण्याचे फायदे काय आहेत ते आधी जाणून घेऊया. 

पान खाण्याचे फायदे 

दुपारी जेवण झाल्यानंतर पानाची पेस्ट चघळल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारतं. पान खाल्यानंतर आपल्या श्वासातील दुर्गंधी दूर होते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशी माहिती कळते की दातदुखी, हिरड्या दुखणे किंवा हिरड्यांना सूज येणे या समस्येने त्रस्त लोकांनाही पान खाल्यानं आराम मिळतो. याखेरीज तोडांचे आजारही सतावत नाहीत. पोटाची पीएच पातळीही पान खाल्लानं सुधारते असं म्हणतात. तसेच भुकही वाढते. सुपारीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. याचा वापर थायरॉईडसाठीही गुणकारी असतो. रक्तातील साखरेच्या (Blood Sugar) नियत्रंणासाठीही त्याचा वापर होतो. पान खाल्ल्यानं मोठ्या आजारांवर मातही करता येते. 

 

 

पान खाण्याचे दुष्परिणाम 

पानाचे परिणाम हे कॅफिन (Caffine) आणि तंबाखूप्रमाणे असतात. त्यामुळे आपल्याला पान खाण्याचे व्यसनही महागात पडू शकते. पानाचे अतिसेवन केल्याने हिरड्या, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच याने तोंडाचे विकारही होतात. तोंडाचे लाळही (Mouth Diaeases) गळायला लागते. याच्या जास्त सेवनानं आपल्या छातीतही दुखायला लागते तसेच रक्तदाबावरही (Blood Pressure) परिणाम होतो.  पान खाल्ल्याने तुमच्या तोंडावर परिणाम होण्याची शक्यता असते तसेच तुमच्या दातांवरही परिणाम होऊ शकतात.