Health Tips : ऑफिसमध्ये अचानक थकवा जाणतो?, मग जवळ ठेवा 'हे' Magical Food

Health Tips 2022 :  अनेक वेळा ऑफिस असो किंवा घरात काम करताना अचानक आपल्या थकवा, सुस्ती जाणवते. मग त्यानंतर काही काम करावसं वाटतं नाही. मग असावेळी आपल्या किचनमध्ये असलेले काही पदार्थ तुम्हाला झटपट उर्जा मिळवून देतील.   

Updated: Nov 18, 2022, 09:05 AM IST
Health Tips : ऑफिसमध्ये अचानक थकवा जाणतो?, मग जवळ ठेवा 'हे' Magical Food title=
health tips 2022 natural energy boosting foods trending nmp

Natural Health Tips : कोरोना (Corona) काळानंतर प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. निरोगी राहण्यासाठी (stay healthy) आपल्या उर्जा देणारे अन्न पदार्थांसोबत व्यायाम करणे गरजेचं आहे. पण पौष्टिक नाश्ता करूनही ऑफिसमध्ये अचानक लो वाटायला लागतं.  थकवा आणि सुस्ती (Fatigue) जाणवते. अशावेळी काय कामात मन लागतं नाही. मग अशावेळी अनेक जण चहा घेतात. पण आज आम्ही तुम्हाला दादी की पोटलीतून काही झटपट उर्जा देणारे (Instant energy) पदार्थ सांगणार आहोत. ते कायम तुम्ही जवळ बाळगा. ही पदार्थ (Food) तुम्ही लहान मुलांनाही शाळेत जाताना किंवा खेळाडूंना द्या. (health tips 2022 natural energy boosting foods trending nmp)

1. हर्बल चहा किंवा कॉफी प्या (Herbal tea or coffee)  - आताच आम्ही बोललो अनेक जण थकवा, सुस्ती जाणवायला लागले की चहा पितात. पण थांबा चहा ऐवजी तुम्ही Instant Energy साठी हर्बल चहा किंवा कॉफी घ्या. कॉफीमध्ये कॅफिन असतं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. 

2. अंडे (Egg) - अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातच उकळलेली अंडी खाल्ल्यास तुम्हाला झटपट एनर्जी मिळते. त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी तुम्ही रोज अंडी  खाऊ शकता.

3. पनीर (Paneer) - जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही पनीर, चीज, स्प्राउट्स आणि बीन्स हे पदार्थ डब्ब्यात ठेवा. हे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत ज्यात मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असतं त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळते. 

4. बदाम (Almonds) - बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे तुमच्या पोटलीत कायम काही बदाम ठेवा. ज्यामुळे तुम्ही बदाम खाल्ल्यास तुम्हाला लगेचच उर्जा मिळेल. 

5. केळी (Banana) - अनेकांना माहिती आहे, केळी मध्ये व्हिटॅमिन बी, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एक केळी खाल्ल्यास तुम्हाला भरपूर आणि झटपट ऊर्जा मिळले. 

6. लिंबूपाणी (Lemon Water) - जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता. 

7. पाणी (Water) - निरोगी राहण्याचं उत्तम स्त्रोत म्हणजे पाणी. त्यामुळे डॉक्टर पण सांगतात भरपूर प्रमाणात पाणी प्या. कमी पाणी प्यायल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो. 

 8. हंगामी फळं (Seasonal fruits) -  हंगामी फळांचे सेवन करूनही तुम्ही झटपट ऊर्जा घेऊ शकता. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)