रोज एक ग्लास हळदीचं दूध आरोग्यास लाभदायक

दूध हा एक पदार्थ आहे जो शरीरास मजबूत ठेवतो.

Updated: May 30, 2021, 03:20 PM IST
रोज एक ग्लास हळदीचं दूध आरोग्यास लाभदायक title=

मुंबई : दूध हा एक पदार्थ आहे जो शरीरास मजबूत ठेवतो. दररोज दूधाचं सेवन करणं आरोग्यास लाभदायक ठारतं. विशेषतः कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं महत्त्वाचं आहे. अशात दूधात हळद घालून प्यायल्याचे अनेक फायदे आहेत. दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही एँटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. 

पचन : हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.

श्वास घेण्यास त्रास : श्वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. कफ यावर तत्काळ आराम पडतो.

वजन कमी करणे : हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

ब्लड शुगर : आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.

सर्दी : सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.

सुंदर त्वचा : दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या  गोष्टींपासून संरक्षण होते.