Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर

Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.

Updated: Jan 20, 2023, 03:48 PM IST
Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर  title=

Health News Methi Ajwain Benefits : थंडीच्या दिवसात थंडी, ताप कॉमन आहे. अशीवेळी मेथी आणि ओवा याचा एक उपाय खूप गुणकारी आहे. (Health News ) आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेले अनेक प्रकारचे मसाले तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. या यादीमध्ये मेथी आणि ओवा यांचा समावेश आहे, ज्याच्या वापराने सर्दी आणि तापापासून पोटातील गॅसची समस्या दूर होते. याशिवाय हे दोन्ही पदार्थ रोज खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहून लठ्ठपणा कमी करता येतो. (Health News in Marathi)

मेथी आणि ओवा खूप उपयुक्त आहे. आपल्या शरीराला अनेक प्रकारे आजार यांच्या वापराने दूर होतात. त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात नेहमी मेथी आणि ओवा ठेवला पाहिजे.  

लठ्ठपणा दूर करा

वयानुसार आपल्या शरीरातील पचन क्रिया कमी होऊ लागते. ज्यामुळे आपले वजन वाढते. एक ग्लास कोमट पाण्यात ओवा आणि मेथी पावडर मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीराचे अतिरिक्त वजन झपाट्याने कमी होते. हे दोन्ही मसाले अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे पचन व्यवस्था सुधारण्यास मदत करते.

शुगर पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत

ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे, त्यांनी ओवा आणि मेथीचे एकत्र सेवन करावे. मेथी रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ-उतार नियंत्रित करते.

पोटाती गॅसची समस्या दूर होण्यास मदत

ओवा आणि मेथी पोटाच्या समस्येवर गुणकारी आहे.  ओवा आणि मेथी गॅस , अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी दूर करण्यात मदत करतात. या दोन्हीचे चूर्ण मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होतील आणि तणावही कमी होईल.

सर्दी

सर्दीमध्ये एक ग्लास कोमट पाण्यात ओवा पावडर मिसळून पिणे फायदेशीर ठरते. ओव्यामध्ये जीवाणू संसर्ग आणि विषाणूंविरुद्ध लढणारे गुणधर्म आहेत. यामुळे घशीची खवखव बरी होते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)