दरवर्षी 4 लाख जणांचा बळी घेणाऱ्या आजारावर अखेर लस तयार, ‘WHO’ कडूनही मंजुरी

Anti Malaria Vaccine : जसंजसे  ऋतूं  बदलतात तसंतसे विविध आजारांचा ही सामना करावा लागतो. त्यातील बऱ्याचशा आजारांवर लसी किंवा परिणामकारक औषधी उपचार मिळतात. तशातच आता संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Jan 23, 2024, 01:43 PM IST
दरवर्षी 4 लाख जणांचा बळी घेणाऱ्या आजारावर अखेर लस तयार, ‘WHO’ कडूनही मंजुरी title=

Anti Malaria Vaccine News In Marathi : मलेरिया म्हणजेच हिवताप हा संसर्गजन्य आजार आहे. मलेरिया  ऍनोफिलीस जातीता बाधित डास चावल्यामुळे हा आजार होतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांपैकी मलेरिया हा सर्वात धोकादायक मानला जातो. मलेरियामुळे जगभरात दरवर्षी अंदाजे 4 लाख जणांचा मृत्यू होतो. आफ्रिकन देशांमध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)या जीवघेना मलेरिया रोगाविरूद्ध जगातील पहिली लसीला मान्यता दिली आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यात यश येईल.

हे लसीकरण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यताप्राप्त RTS,S लसीद्वारे केले जाईल. जे ब्रिटिश औषध निर्माता GSK ने विकसित केली आहे. सुरुवातीला, ही लस कॅमेरूनच्या 42 जिल्ह्यांतील मुलांना दिली जाईल ज्यांना मलेरियाने सर्वाधिक प्रभावित केले आहे. मलेरियावर लस देणारा कॅमेरून हा पहिला देश ठरला आहे.  ही लस आफ्रिकेतील हजारो मुलांचे प्राण वाचवेल असा विश्वास आहे. ही लस दरवर्षी 4 लाखांहून अधिक मुलांचे प्राण वाचवू शकते, असा अंदाज डब्ल्यूएचओने व्यक्त केला आहे.

विशेषतः, मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये होत असतात. एका मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे मृत्यू होतो. जगातील एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू केवळ 6 आफ्रिकन देशांमध्ये होतात. यापैकी एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात. 2019 मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे.

2019 पासून 20 लाख डोसची चाचणी

1987 मध्ये GSK द्वारे उत्पादित केलेले औषध, घाना, केनिया आणि मलावीमध्ये 2019 पासून 20 दशलक्ष डोससह प्रशासित केले जात आहे. त्यांची चाचणी केल्यानंतर, लसीला अखेरला जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक वापरासाठी मान्यता दिली. तसेच, सहारन आफ्रिकन देशांमध्ये, लहान मुलानवर किंवा लासिया वापरण्याची शिफारस केली जाते. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना 4 डोस दिले जातील.

दरम्यान 2019 मध्ये मलेरियामुळे जगभरात 4.09 लाख मृत्यू झाले. त्यापैकी 67% म्हणजे 2.74% मुले ज्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे. 2019 मध्ये भारतात मलेरियाचे 3 लाख 38 हजार 494 रुग्ण आढळले आणि 77 लोकांचा मृत्यू झाला. 2015 मध्ये सर्वाधिक 384 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.