Green Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती

फिट आणि फाईन रहाण्यासाठी तुम्ही सुद्धा Green Tea पिता, पण तुमच्या आवडीला वेळीच मुरड घाला... ग्रीन टी उपायांपेक्षा होऊ शकतो अपाय

Updated: Dec 7, 2022, 05:06 PM IST
Green Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती title=

Green Tea Side Effect : फिट आणि फाईन राहायचं असेल तर ग्रीन टी प्या, अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ग्रीन टी (Green Tea) प्यायल्यानं तुम्ही स्लीम व्हाल, तुमची इम्युनिटी (Immunity) वाढेल, असे दावेही केले जातात. पण या दाव्यांना कोणताही ठोस वैज्ञानिक आधार (Scientific Base) नाही. या जाहिरातबाजीला (Advertise) बळी पडून तुम्ही ग्रीन टी सेवन करत असाल तर आताच सावध व्हा... 

जीवघेणी ग्रीन टी
डायबिटीस (Diabetes), स्थूलपणा (Obesity) आणि हृदय रोगाच्या (Heart Disease) रुग्णांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण ग्रीन टीच्या जादा सेवनामुळं तुमच्या यकृताला (Liver) धोका निर्माण होऊ शकतो. द जर्नल ऑफ डायटरी सप्लिमेंटच्या ताज्या अभ्यासात ही धक्कादायक बाब उघड झालीय. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन (Catechin) नावाचं अँटी ऑक्सीडंट (Anti-oxidant) असतं, त्यामुळं यकृताला सूज येऊ शकते

गेल्या वर्षभरापासून संशोधक ग्रीन टी सेवन करणाऱ्यांचा अभ्यास करत होते. यामध्ये पाळी गेलेल्या महिलांचाही समावेश करण्यात आला होता. यात एक हजार महिलांचा समावेश करण्यात आला होता. 3, 6, 9 आणि 12 महीन्यांचा डेटा यात गोळा करण्यात आला. यात धक्कादायक माहिती समोर आली.

'ग्रीन टी'चे साईड इफेक्ट्स 
हाय रिस्क जीनोटाइपवाल्या महिलांच्या यकृताला 80 टक्के तर लो रिस्क जीनोटाइपवाल्या महिलांच्या यकृताला 30 टक्के सूज आल्याचं आढळून आलं. त्याशिवाय एक कप ग्रीन टीमध्ये 12 मिलीग्रॅम कॅफीन (Caffeine) असतं. कॅफीनमुळं चक्कर येणे, कमी झोप येणे, उलटी, अस्वस्थता अशा लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. कॅफीनच्या जादा सेवनामुळं पचनसंस्थाही बिघडून जाते. जादा ग्रीन टी प्यायल्यानं शरीरातील लोहाचं प्रमाणही कमी होऊ शकतं

हे ही वाचा : Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणाचं हॉलीवूड कनेक्शन, आतापर्यंतचा मोठा खुलासा

ग्रीन टीमुळं उपायांपेक्षा आरोग्याला अपायच जास्त होतात, असं या संशोधनात आढळलं. त्यामुळं दिवसातून दोनवेळेपेक्षा जास्त ग्रीन टी पिता कामा नये. आणि गरोदरपणात महिलांनी तर ग्रीन टी घेणं टाळावं, असा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हालाही ग्रीन टी पिण्याची आवड असेल, तर आता तुमच्या आवडीला मुरड घालण्याची वेळ आलीय.