मुंबई : माणसाचं शरीर हे 70 % पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे स्वास्थ्य सुधारण्यासाठी तुम्हांला नियमित मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे आहे. नियमित किमान 2-3 लीटर पाणी पिणं गरजेचे आहे असा सल्ला हमखास दिला जातो.
किडनीस्टोन, हृद्यविकार, डीहायड्रेशन अशा समस्यांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने नियमित मुबलक पाणी पिणं गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक वेळाच्या फरकाने पाणी पिण्याची सवय नक्की लावून घ्या.
दिवसाची सुरूवातही रिकाम्या पोटी पाण्याने करणे फायदेशीर आहे. हेच पाणी उठल्या उठल्या काहीही खाण्यापूर्वी, ब्रश करण्यापूर्वी केल्यास आरोग्यावर त्याचे काही चमत्कारिक परिणाम दिसतात. या उपायामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.
रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.
रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.