मुंबई : ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे
जर तुम्ही कामानंतर मानसिकरित्या थकत असाल तर ग्रीन टी पिणे शरीराला फायदेशीर ठरते. ग्रीन टीमध्ये थेनाईन तत्व असते ज्यात अमिनो अॅसिड बनते. अमिनो अॅसिड शरीरात ताजेपणा कायम ठेवण्यास मदत करते. तसेच तुम्हाला थकवा जाणवत नाही.
सध्याच्या युवा तसेच वृद्धांमध्ये दातांमध्ये पायरिया वा कॅव्हिटीच्या समस्या वेगाने वाढतायत. ग्रीन टीमध्ये कॅफीन असते जे दातांवरील किटाणू मारण्यास सक्षम असते. बॅक्टेरिया कमी झाल्याने अधिक काळापर्यंत तुमचे दात चांगले राहतात.
सध्या व्यस्त जीवनामुळे त्यातच ऑफिसमधील तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्याही वाढू लागलीये.तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर ग्रीन टी प्या.
हृदय रोग असणाऱ्यांसाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते. ग्रीन टी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करताना चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही तेलकट जेवण जेवता तर नियमितपणे ग्रीन टीचे सेवन करा.
तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढलीये. तर ग्रीन टीचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. याशिवाय ज्यांना डायबेटीजची समस्या आहे त्यांनी सकाळी उठून दिवसाला एक कप ग्रीन टी प्यावा. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहील.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी ठरते. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म रेट वाढतो ज्यामुळे पाचनक्रिया सुरळीत होते.