मुंबई : घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो.
१) घोळ माशातील डीएचए अ अणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे. सोबतच यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते.
२) घोळ माशात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीए आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. मुबलक प्रमाणात ओमेगा 3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला, नसांना त्यांचा फायदा होतो.
३) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे. अकाली चेहर्यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो. त्वचा मुलायम राहते.
४) शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते.
५) घोळ माशातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते. दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते.
६) मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारे शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.