मुंबई : बटाट्याप्रमाणे दिसणाऱ्या चिकूमध्ये गुणांची खाण आहे. मधासारखा गोड आणि स्वादिष्ट अशा चिकूमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. चिकू खाल्ल्याने शरीरास अनेक पोषकतत्वे मिळतात.
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. अन्यथा डिहायड्रेशनचा धोका असतो. शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी चिकूचा फायदा होतो.
चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. चिकू खाल्ल्याने पाचनक्षमता सुधारते. यासाठी चिकूवर मीठ टाकून खा. यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
चिकू Colon Cancer, Oral Cavity आणि Lung Cancer सारख्या आजारांपासून वाचण्यास मदत करतो.
चिकूमध्ये व्हिटामिन मिनरल्स आणि साखरेप्रमाणे सुक्रोज आणि फ्रुक्टोज घटक असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.
यात व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते जे डोळ्यांसाठी चांगले असते.
अति गोड खाल्ल्याने वा ब्रश न केल्यास दातांमध्ये कॅव्हिटी होते. यावर चिकूची साल काढन खा. यातील लॅक्टसमुळे फायदा होतो.
चेहऱ्याची सुंदरता कायम ठेवण्यासाठी चिकू खावेत. यामुळे त्वचेचा रंग उजळतो.