दररोज भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे

जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. 

Updated: Aug 11, 2019, 01:48 PM IST
दररोज भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे title=

मुंबई : जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. 

वसंत कुंज येथील इंडियन स्पाइनल इंज्युरी सेंटरच्या सीनियर डायटीशियन डॉ. हिमांशी शर्मा यांनी, एका व्यक्तीने दररोज ५० ते ६० ग्राम चणे दररोज खाणं फायदेशीर असल्याचं सांगतिलं. 

रोगप्रतिकार क्षमता वाढते

दररोज नाश्ता करताना किंवा दुपारी जेवणाच्या आधी ५० ग्राम चणे खाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. त्याशिवाय बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या शारिरीक समस्याही दूर होतात.

वजन कमी करते

भाजलेले चणे खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भाजलेल्या चण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते.

मुत्रसंबंधी रोग

भाजलेले चणे खाल्ल्याने मुत्रसंबंधी समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होण्याची समस्या आहे, त्यांना भाजलेले चणे आणि गुळ दररोज खाल्ल्याने काही दिवसांत फरक दिसेल.

बद्धकोष्ठता

ज्यांना बद्धकोष्ठताची समस्या आहे, त्यांना दररोज चणे खाल्याने फायदा होतो. बद्धकोष्ठता शरीरातील अनेक आजारांचे मूळ कारण ठरते. बद्धकोष्ठता असल्यास दिवसभर आळसपणा, अस्वस्थ जाणवते.

पचनशक्ती वाढवते

भाजलेले चणे पचनशक्ती संतुलित करण्याचं काम करतात. चण्यामुळे रक्त शुद्ध होतं. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यासही फायदा होतो. चण्यामध्ये फॉस्फरस असतं, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि किडनीतील अतिरिक्त मीठही निघून जातं.

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेही रुग्णांसाठीही भाजलेले चणे गुणकारी आहेत. भाजलेले चणे ग्लूकोजचं प्रमाण धरुन ठेवतं त्यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो. मधुमेहींनी दररोज भाजलेले चणे खाण्याने ब्लड-शुगर लेवल कमी होते.