दालचिनीचे ६ मोठे फायदे

दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे अनेक गुण आहेत जे आजार दूर करण्यास मदत करतात.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 9, 2017, 04:45 PM IST
दालचिनीचे ६ मोठे फायदे title=

मुंबई : दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे अनेक गुण आहेत जे आजार दूर करण्यास मदत करतात.

जाणून घ्या याचे फायदे

सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी चांगला पर्याय आहे. एका गरम पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळा. हे मिश्रण प्यायल्याने आराम मिळतो.

चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यासाठी दालचिनी पावडरला लिंबूच्या रसात मिसळल्याने मुरुमे दूर होतात.

पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास दालचिनी आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्याने फायदा होतो. 

केस गळती रोखण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मध आणि दालचिनी पेस्ट बनवून आंघोळीआधी ३० मिनिटे लावून ठेवा. यामुळे केसगळती बंद होईल. 

सर्दीचा त्रास असल्यास दालचिनी पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. या पाण्यात मध मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.

दालचिनी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. दालचिनी पाण्यात उकळून गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या.