नारळ पाणी प्या सगळेच सांगतात, पण ते कधी पिऊ नये माहितीये?

Coconut Water : कधी त्याचे वाईट परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का? 

Updated: Oct 7, 2022, 12:49 PM IST
नारळ पाणी प्या सगळेच सांगतात, पण ते कधी पिऊ नये माहितीये? title=
have you ever read side effects of coconut water

side effects of coconut water : आजारी असणाऱ्यांपासून ते अगदी सुदृढ असणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी नारळपाणी म्हणजे वरदान. त्वचा, केस, पचनशक्ती, शरीरातील पाण्याची पातळी या साऱ्या गोष्टींसाठी नारळ पाणी (coconut water) अतिशय फायद्याचं ठरतं. बऱ्याचदा गर्भवती मातांनाही नारळपणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मुळात नारळाचं पाणी पिण्याचा सल्ला अनेकजण देतात. त्याचे फायदेही सांगतात. पण, कधी त्याचे वाईट परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का? (have you ever read side effects of coconut water)

रक्तदाब (Blood Pressure) कमी करण्यासाठी नारळ पाण्याचा बराच फायदा होतो. पण, अनेकदा त्याच्या अती सेवनामुळे रक्तदाब अपेक्षेहून कमी होण्याचाही धोका असतो. यामध्ये असणारं पोटॅशियमचं (potassium) प्रमाण पाहता किडनीचे विकार ( kidney disease) असणाऱ्यांना बेतानंच नारळ पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो.  

सिस्टिक फाईब्रोसिसचा त्रास असणाऱ्यांना नारळ पाणी न पिण्याचाच सल्ला देण्यात येतो. कारण यामुळं शरीरातील मीठाचं प्रमाण वाढतं. कोणतीही शस्त्रक्रिया होण्यापूर्वी नारळपाणी पिऊ नका, त्यामुळं रक्तदाब कमी होतो. 

बातमीची लिंक : तुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी

 

पोटाचे विकार (Stomach issues) असल्यास नारळ पाणी पिणं तुलनेनं कमी करा. असं केल्यास अतिसाराचं प्रमाण वाञून त्रास बळावू शकतो. सर्दी- पडसं (Cold and flu) असल्यास चुकूनही नारळ पाणी पिऊ नका. हा त्रास आणखी बळावेल. 

बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट चांगली असल्यास, त्याचे फायदेच सांगितले जातात. पण, ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे चांगल्याची वाईट बाजूही समोर येणं तितकंच महत्त्वाचं असतं. नाही का?