नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात म्हणजेच Dumbbells मध्ये टॉयलेट सीटपेक्षाही सर्वात जास्त म्हणजे 362 पट जास्त किटाणू असतात. त्यामुळे जिममध्ये तुम्ही आरोग्य सुधारण्यासाठी जाता की बिघडवण्यासाठी? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.
FitRated ने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जिममधील ट्रेडमिल, एक्सरसाईज बाईक आणि फ्री वेट, डम्बेल्स यावर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया आढळली.
FirRated चे मेंबर Chelsea Freeburn यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिममध्ये सगळेच इक्विपमेंट हे सार्वजनिक असतात. या वस्तूंना बरेच लोक हाताळत असतात. हे इक्विपमेंट प्रत्येकाने वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ पुसले नाहीत तर त्यामधील बॅक्टेरियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतात.
हे सांगताना फ्रीबर्न यांनी सांगितले की, तुम्ही खूप लोकांना हँडशेक करत असाल तर त्यावेळी तुमच्या हातांना बॅक्टेरिया लागतात. अगदी त्याचप्रमाणे ट्रेडमिलवर असलेले बॅक्टेरिया हे पब्लिक बाथरुमच्या 74 पटीने जास्त असतात, असा खुलासा रिसर्चमध्ये करण्यात आलाय.
जिममधील प्रत्येक इक्विपमेंटवर असलेल्या बॅक्टेरियामुळे वेगवेगळे संसर्गजन्य आजार होतात. जसे की, स्किन इन्फेक्शन, अँटीबायोटिक शरीरात काम करणं कमी होतं.
अभ्यासानुसार जिममधील व्यायामाच्या गोष्टी एकाच दिवशी अनेक लोक वापरतात. आरोग्याच्या दृष्टीकोनातून चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे त्यावर जंतूचा प्रादुर्भाव अधिक होतो. अनेक जिममध्ये वाईप्स वापरण्यात येतात. पण अभ्यासात सांगितल्यानुसार त्याचा फार वापर होत नाही.
यामुळे अभ्यासात असं सांगितलं आहे की, बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता राखणं गरजेचं आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना काही गोष्टींचे पालन कटाक्षाने करायला हवे. ज्यामध्ये हायजिन राखणे गरजेचे आहे. सतत चेहऱ्याला हात लावणे टाळा, जिमला जाण्यापूर्वी किंवा जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवा.
शौचालयाचा वापर केल्यानंतर लोक उघड्यावर फ्लश चालवतात असे अनेकदा दिसून येते. डॉक्टरांच्या मते फ्लश टॉयलेट नेहमी झाकून ठेवावे. असे केल्याने बॅक्टेरिया हवेत पसरत नाहीत आणि आजारांचा धोका कमी होतो. त्याचबरोबर जे लोक टॉयलेट सीटवर बसून फ्लश करतात त्यांनीही असे करणे टाळावे. जेव्हा तुम्ही टॉयलेट सीटवर बसून फ्लश करता तेव्हा बॅक्टेरिया हवा, आजूबाजूचे वातावरण आणि शरीराच्या संपर्कात येतात आणि तुम्हाला त्वचा आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशावेळी टॉयलेट सीट बंद करुन फ्लश करावे नियमितप्रमाणे टॉयलेट स्वच्छ करावं महिलांनी विशेष काळजी घ्यावी.