Why Do We Drink Brandy Or Rum In Winter: हिवाळा सुरू झाल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत वाढ होते. हवामान कोरडे असल्यामुळं सर्दी-खोकला बरा होण्यासही वेळ लागतो. अशावेळी मस्करी मस्करीमध्ये एक सल्ला दिला जातो. तो म्हणजे गरम पाण्यातून थोडी रम किंवा ब्रँडी पात्री प्या. जेणेकरुन तुमचा खोकला आणि सर्दी लगेचच ठिक होईल. पण हा दावा खरा आहे का. हिवाळ्यात किंवा खोकल्यावर औषध म्हणून ब्रँडी किंवा रम प्यावी का? याला वैज्ञानिक आधार काय आहे? व या दाव्यात किती सत्यता आहे?, हे जाणून घेऊया. (Brandy Or Rum Effect On Body)
सगळ्यात पहिले आपण दारू कशी बनवली जाते हे जाणून घेऊया. रमचा ही उष्ण असते. उसाच्या बायप्रोडक्टपासून रम बनवण्यात येते. तर ब्रँडी बनवण्यासाठी फळांचा रस आणि डिसिल्ड वाइनचा वापर केला जातो. थंड हवेच्या प्रदेशातील लोक जास्त करुन रम किंवा ब्रँडी पितात. हिवाळ्यात संध्याकाळी एक रम किंवा ब्रँडी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, असा दावा केला जातो.
सर्दी-खोकला यांबरोबरच ब्रँडी आणि रम प्यायल्याने अनेक आजार दूर होतात, असा दावा केला जातो. यातच सांधे दुखी तसंच अर्थराइटिसवर देखील आराम मिळतो, असं सांगण्यात येते. त्याचबरोबर हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होते. आर्टेरी ब्लॉकेजमध्येही फायदा होत असल्याचा दावा केला जातो. काही जण तर असाही दावा करतात की यामुळं श्वसनाचे विकार दूर होतात. कारण रम किंवा ब्रँडीमध्ये फ्लामेटरी गुण आढळले जातात, त्यामुळं असा दावा करण्यात येतो.
दारूमुळं शरीरात उष्णता निर्माण होते, याला विज्ञानही दुजोरा देते. म्हणजेच जे अल्कोहोल जितके स्ट्रॉग असते तितकीच त्यामुळं जास्त उष्णता शरीराला मिळते. मात्र यामुळं आजार ठिक होतात हा दावा मात्र आधारहीन आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलमुळं शरीराला नुकसान होते. रम असो किंवा ब्रँडी यामुळं तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमजोर करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)