मानेवर अतिरिक्त चरबी जमा झालीये; 'या' चार पद्धतीने घरबसल्या कमी करा डबल चीन

Double Chin Exercise: गळ्याजवळ लोंबणारी अथवा लटकणारी सैल त्वचा यामुळे कोणाचेही व्यक्तिमत्त्व अणि सौंदर्य बिघडू शकते. याला डबल चिन (double chin) असेही म्हणतात. जाणून घ्या काही व्यायाम प्रकार जे तुमच्या मानेवरचा आणि डबल चिन कमी करण्यास मदत करतील.  . 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 20, 2023, 06:30 PM IST
मानेवर अतिरिक्त चरबी जमा झालीये; 'या' चार पद्धतीने घरबसल्या कमी करा डबल चीन title=
Get Rid of My Double Chin with the help of these Exercises in marathi

Neck Fat Reduce Exercise: वजन वाढत असताना त्याचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. पोट, मांड्या, हातावर अतिरिक्त चरबी वाढ जाते. कधीकधी मानेजवळही अतिरिक्त चरबी वाढते. यामुळं तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. परफेक्ट जॉलाइन हवे असल्याल डबल चीन कमी करणे मोठे आव्हानात्मक ठरते. आहारात बदल करुन किंवा रेग्युलर व्यायाम करुनही कधीकधी डबल चीन कमी होत नाही. डबल चीन कमी करण्यासाठी तुम्ही फेशियल व्यायाम करण्याकडे भर द्या. रेग्युलर फेशियल व्यायाम करुन तुम्ही काहीच दिवसांत मानेवरची चरबी कमी कराल. 

मानेवर अतिरिक्त चरबी जमा होण्याची अनेक कारणे असतात. वय, अनुवंशिकता, लठ्ठपणा, चेहऱ्याची ठेवणे या साऱ्या कारणांमुळं मानेवर अतिरिक्त चरबी निर्माण होऊ शकते. मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आज अनेक इलेक्ट्रोनिक गॅजेट उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही घरगुती पद्धतीनेही मानेवरची चरबी कमी करु शकता. 
 

डबल चिन कमी करण्यासाठी करा हे व्यायाम 

तोंडाचा फुगा फुगवाः रोज थोड्या थोड्या वेळाने तोंडांचा फुगा फुगवा. यामुळं मानेचा व्यायाम होईल आणि मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होईल. तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी रोज हा व्यायाम तुमच्या रुटिनमध्ये सामील करा. 

च्युंइग-गम चघळाः  च्युंइग गम चिघळणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यासाठी तुम्हाला व्यायामासाठी वेळ काढण्याची गरज नाही. 15 ते 20 मिनिटांसाठी जर तुम्ही च्युंइग गम चघळत राहिलात तर जॉ-लाइन जवळची चरबी लगेचच कमी होईल. 

O व्यायाम आहे फायदेशीरः दिवसातून थोडा वेळ O एक्सरसाइजसाठी काढायला हवा. टिव्ही बघत असताना किंवा पोळ्या लाटतानादेखील तुम्ही हा व्यायाम करु शकता. या व्यायामात तुम्हाला फक्त तोंडाने O म्हणायचे आहे. काही सेंकद फक्त O म्हणा आणि दोन सेकंद थांबून पुन्हा हि प्रक्रिया सुरू करा. कमीत कमी 15 वेळा ही प्रक्रिया करा. रोज हा व्यायाम केल्याने तुमच्या चेहऱ्यावर लवकरच रिझल्ट दिसून येईल. 

हॉट वॉटर ट्रिटमेंटः ही पद्धतही मानेवरील चरबी घटवण्यासाठी फायदेशीर आहे. रोज 10 ते 15 दिवस गरम टॉवेल मानेच्या जवळ ठेवून शेक घ्या. रोज असं केल्यास फेस फॅट कमी होण्यास मदत होईल. 

भरपूर प्रमाणात पाणी प्याः जास्त पाणी पिल्ल्यास मानेवरील चरबी लगेचच उतरेल. पाणी पोटात एक्स्ट्रा फुड इनटेकसाठी जागाच उरणार नाही. अशावेळी तुम्ही कमी प्रमाणात खाल आणि त्यामुळं शरीरातील चरबी मेणासारखी वितळेल. तसंच, तुमच्या आहारात तेलकट व मसालेदार पदार्थांऐवजी फळे व सलाड घ्या. 

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)