मुंबई : साधारणपणे थकल्यानंतर किंवा कंटाळा आला की आपण जांभई देतो. मात्र काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभाई देण्याची सवय असते. जांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणार्या काही आजारांच्या धोक्याचे संकेत 'जांभई'मधून मिळतात. म्हणूनच तुम्हांलाही वारंवार जांभाई येत असल्यास 'या' आजारांचा धोका वाढतोय का? हे नक्की तपासून पहा.
1. एखाद्या व्यक्तीचं लिव्हर ( यकृत) बिघडले की त्यांना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांशी बोला.
2. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृद्य आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचं प्रमाण अधिक असते. हृद्य आणि फुफ्फुसाचं काम नीट होत नसल्यास यामुळे अस्थमाचा त्रास वाढू शकतो.
3. एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. ब्रेन ट्युमरमध्ये पिट्युटरी ग्लॅन्डवर ताण येतो परिणामी जांभई येण्याचं प्रमाण वाढतं.
4. ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृद्याची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. जांभई द्वारा तोंडाद्वारा श्वास घेतला जातो. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो.