Urine Infection : आपलं शरीर अत्यंत गुंतागुंतीचं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं वेशेष असं कार्य आहे. आपलं हृदय ( heart function) , आपलं यकृत ( liver function), आपला मेंदू (brain function )आपल्या किडन्या (kydney function) आणि इतर अवयव कोणतं ना कोणतं विशेष काम करतात. शरीरातील कोणत्याही अवयवात काहीही बिघाड झाला तर त्याची लक्षणं आपल्याला आपल्या शरीरावर पाहायला मिळतात. ही लक्षणे म्हणजे एक प्रकारचा शरीराचा अलर्ट असतो. यातल्याच एका महत्त्वाच्या अलर्टबाबत आज तुम्हाला सांगणार आहोत. हा अलर्ट म्हणजे तुम्हला वारंवार लघवीला लागत (frequent urination) असेल तर शरीर नक्की काय सांगत असतं? जाणून घेऊया.
तुम्हाला वारंवार लघवीला लागत असेल तर तुम्हाला डायबिटीस (diabetes), किडनी किंवा युरीन ट्रॅक स्टोन ( Urine Tract Stone) , युरीन ट्रॅक इन्फेक्शन (UTI) अतिसक्रिय ब्लॅडर (bladder cancer) या समस्या असू शकतात.
याबाबत आणखी सविस्तर जाणून घेऊयात, मात्र याआधी जाणून घेऊयात नॉर्मल काय (what is normal) असतं हे जाणून घेणं आहे महत्त्वाचं. एखाद्याला दिवसातून साधारण ४ ते ७ वेळा युरिनसाठी जायला लागू शकतं. जर तुम्ही सर्वसाधारणपणे दिवसात दोन सव्वादोन लिटर द्रव्य सेवन करत असाल तर चार ते सात वेळा लघवीला लागणं नॉर्मल आहे. मात्र, यापेक्षा जास्तवेळेस लागवीला जावं लागणं किंवा वॉशरूमला जायचं फिलिंग येणं, हा एक अलर्ट आहे.
तज्ज्ञांच्या मते तुम्हालाही दिवसातून बरेचदा वॉशरूम गाठावं लागत असेल तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांना गाठलं तेवढ्या लवकर तुमच्या आजाराचं निदान होऊ शकेल आणि तेवढ्या लवकर तुम्ही जपासून स्वतःची सुटका करू शकाल.
तुम्हाला स्ट्रोक, एन्झायटी, ब्लॅडर कॅन्सर, ओटीपोटातील ट्युमर असे आजार असल्यास तुम्हाला सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजेच SIT होऊ शकतं. यामुळे तुम्हाला वारंवार जायला लागू शकतं. त्यामुळे तुम्हालाही वारंवार लघवीला जायला लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
frequent urination is cause of many serious health problems dont neglect seek doctor advise.