दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा !

नवी दिल्ली : आजकाल डाएट सर्रास केले जाते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी तूप, लोणी, पनीर यांसारखे पदार्थ कटाक्षाने टाळतात. परंतु, हे चुकीचे आहे हे सिद्ध करणारा एक अहवाल हाती आला आहे

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 31, 2017, 05:37 PM IST
 दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा ! title=

नवी दिल्ली : आजकाल डाएट सर्रास केले जाते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी तूप, लोणी, पनीर यांसारखे पदार्थ कटाक्षाने टाळतात. परंतु, हे चुकीचे आहे हे सिद्ध करणारा एक अहवाल हाती आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, हे सगळे पदार्थ दीर्घायुष्यासाठी गरजेचे आहेत. 

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कमी फॅट असलेले पदार्थ खाल्याने अवेळी होणाऱ्या मृत्यूची शक्यता वाढते. याचाच अर्थ दीर्घायुषी व्हायचे असेल तर तूप, लोणी, अंड, मासे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. 

कार्बोहायड्रेटच्या अधिक सेवनामुळे मृत्यूदर वाढण्याचा धोका असतो. कॅनडामधील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्रमुख महशीद दहघान यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, "फॅट कमी प्रमाणात घेतल्याने कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात वापरले जातात. म्हणून फॅट्स कमी प्रमाणात घेणाऱ्या आणि कार्बोहाइड्रेट अधिक प्रमाणात घेणाऱ्या दक्षिण आशियाई भागात मृत्युदर अधिक आहे. 

संशोधकांनी पाच खंडातील १ लाख ३५ हजार लोकांवर सुमारे ७ वर्ष संशोधन करून हा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 'लेसेन्ट' या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधकांनी सांगितले की, "आता तरी लोकांनी खाण्या-पिण्याबद्दलचे गैरसमज दूर करायला हवेत."