Fasting Blood Sugar: फास्टिंग ब्लड शुगर तपासताना 'या' चुका टाळा; Diabetes चा रिझल्ट येईल स्टीक

Fasting Blood Sugar: शुगरच्या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, एक म्हणजे फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) आणि दुसरी जेवणानंतरची तपासली जाणारी शुगर. सकाळी रिकाम्या पोटी ब्लड शुगर टेस्ट करून त्याची स्थिती जाणून घेतल्यास औषध आणि खाण्याने नियंत्रणात ठेवता येतं. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 28, 2023, 06:00 PM IST
Fasting Blood Sugar: फास्टिंग ब्लड शुगर तपासताना 'या' चुका टाळा; Diabetes चा रिझल्ट येईल स्टीक title=

Fasting Blood Sugar: चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे बरेच आजार जडण्याची भीती असते. यामध्ये एक आजार म्हणजे मधुमेह. सध्या मधुमेहाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मधुमेही रूग्णांना त्यांची ब्लड शुगर तपासत राहणं आवश्यक असतं. फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) आणि जेवणानंतरच्या साखरेचं निरीक्षण करणे महत्वाचे आहे. शुगरच्या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, एक म्हणजे फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) आणि दुसरी जेवणानंतरची तपासली जाणारी शुगर.

फास्टिंग ब्लड शुगरची चाचणी सकाळी रिकाम्या पोटी केली जाते. ब्लड शुगर टेस्टचा मुख्य उद्देश म्हणजे प्री-डायबेटिस, टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची ( Blood Sugar ) पातळी शोधणं. अनेकदा फास्टिंग ब्लड शुगरचं ( Fasting Blood Sugar Test ) प्रमाण जास्त असतं. सकाळी रिकाम्या पोटी ब्लड शुगर टेस्ट करून त्याची स्थिती जाणून घेतल्यास औषध आणि खाण्याने नियंत्रणात ठेवता येतं. 

फास्टिंग शुगर तपासण्याची योग्य पद्धत

अनेकदा लोक 12-14 तास उपवास केल्यानंतर सकाळी फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) तपासण्यावर भर देतात. त्यांचा असा समज असतो की, त्यांची शुगर टेस्ट स्टिक येईल. मात्र फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) तेव्हाच स्टीक येते ज्यावेळी तुम्ही रात्रीच्या आहाराकडे लक्ष देता आणि सकाळी काही गोष्टींची काळजी घेता.

जर तुम्ही फास्टिंग शुगर तपासत असाल तर तुम्ही सकाळी पाणी देखील प्यायला नको. फास्टिंग शुगर म्हणजे 8-10 तासांच्या उपवासानंतर रक्ताची स्थितीची माहिती घेणं. फास्टिंग शुगर ( Fasting Blood Sugar Test ) तपासताना लक्षात ठेवा की, सकाळी उठल्यापासून एक ते दीड तासाच्या आत टेस्ट करून घ्या. जर तुम्ही दिवसाच्या 12 वाजता फास्टिंग शुगर टेस्ट केली तर तुम्हाला कधीही अचूक परिणाम मिळणार नाही.

फास्टिंग शुगर टेस्ट ( Fasting Blood Sugar Test ) करताना या चुका करणं टाळा

  • जर तुम्ही फास्टिंग शुगर टेस्ट ( Fasting Blood Sugar Test ) करताना रात्री दूध पिऊ नये. दुधामध्ये पेप्टीन नावाचे तत्व असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. 
  • त्याचप्रमाणे जर तुम्ही फास्टिंग शुगर टेस्ट करत असाल तर पायी चालणं टाळा म्हणजेच वॉक करू नका. मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणं आणि व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत होते, तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)