Yoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे

जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा. 

Updated: Sep 1, 2022, 01:38 PM IST
Yoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे   title=

utterfly Yoga : जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा. 

Benefits Of Butterfly Yoga: शतकानुशतके योगासनं मानवजातीसाठी फायदेशीर मानली गेली आहेत. म्हणूनच बहुतेक आरोग्य तज्ज्ञ दररोज योगा करण्याचा सल्ला देतात.  अनेक गंभीर आजारांमध्ये आराम मिळण्यासाठी योगाबाबत ज्ञान असणे गरजेचे आहे.  हे शरीर आणि मन दोन्हीला उत्तम आरोग्य देण्याचे काम योगा करते. योगासने केल्यानंतर सर्व नकारात्मक ऊर्जा शरीरातून निघून जाते, ज्याचा शेवटी आपल्या शरीराला फायदा होतो. विवाहित पुरुषांनाही एका खास प्रकारच्या योगाचा खूप फायदा होतो, ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

विवाहित पुरुषांनी जरुर करावी ही योगासने

लग्नानंतर पुरुषांची जबाबदारी खूप वाढते. त्यामुळे ते अनेकदा आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकत नाहीत आणि आंतरिकदृष्ट्या कमकुवत होतात. अशा स्थितीत पुरुषांनी सकाळी उठून बटरफ्लाय योग (Butterfly Yoga) करावा, ज्यामुळे त्यांना दिवसभर उत्साही वाटेल. चला जाणून घेऊया हे योगासन कसे फायदेशीर आहे.

बटरफ्लाय योग  (Butterfly Yoga) पुरुषांसाठी का फायदेशीर  

1. हे योगसन पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. कारण अशावेळी तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. तसे, बटरफ्लाय योगा (Butterfly Yoga) केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे.

2. अनेक पुरुषांना खूप लवकर थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो, अशा परिस्थितीत त्यांनी Butterfly Yoga मुद्रा अवलंबली पाहिजे, त्याचा त्यांना लवकरच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच, हे योगासन रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. 

3. बटरफ्लाय योग (Butterfly Yoga) केल्याने तुमचे अंतर्गत स्नायू मजबूत होतील आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंच्या ताणतणावातून आराम मिळतो. दुसरीकडे, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर हे योगासन तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते.

Butterfly Yoga कसा करावा?

यासाठी सर्वप्रथम जमिनीवर चटई घाला, त्यानंतर गुडघे वाकवून पाय पेल्विसच्या जवळ आणा, तुमचे तळवे एकमेकांना पूर्णपणे जोडलेले असतील याची काळजी घ्या. दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा. शेवटी, फुलपाखराच्या (Butterfly) पंखाप्रमाणे मांड्या वर आणि खाली हलवण्यास सुरुवात करा. ही पद्धत पुन्हा पुन्हा करा.