Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

Updated: Jun 16, 2022, 02:15 PM IST
Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात title=

मुंबई : मुलाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा तेव्हा पासून सुरु होतो जेव्हा तिला मासिकपाळी येते. साधारणपणे आपल्याकडे याला बाहेरची होणं असं देखील म्हणतात किंवा कावळा शिवल्याचं देखील बोललं जातं. परंतु जेव्हा मुलींना मासिकपाळी येते, तेव्हा त्यांना याबद्दल बरेच प्रश्न उपस्थीत होतात. कारण त्यांना याबद्दल फारसं काही माहित नसतं. अशावेळी मुलींना याबाबत योग्य ती माहिती मिळणे गरजेचं आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

मासिक पाळी दरम्यान अशी खबरदारी घ्या

1. योग्य वेळी पॅड बदला

बर्‍याच वेळा महिला सॅनिटरी नॅपकिन्स बदलण्यात आळशीपण करतात, पण वारंवार रक्तस्त्राव होत असल्याने पॅडमध्ये जास्त रक्त साचते आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे इन्फेक्शन टाळायचे असेल तर, नॅपकिन्स बदलत राहा.

2. आहार घेऊ नका

अनेकदा मुली आपले वाढते वजन कमी करण्यासाठी डाएट कंट्रोलचा अवलंब करतात, पण पीरियड्सच्या काळात तुम्ही योग्य प्रमाणात आहार घ्या आणि पौष्टिक आहार घ्या, अन्यथा शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.

3. जड व्यायाम टाळा

ज्या स्त्रिया स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जड वर्कआउट करतात, त्यांनी मासिक पाळीच्या काळात असे करणे टाळावे, कारण यामुळे पाठदुखी तसेच इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

4. जंक फूड खाऊ नका

बर्‍याच जणांना जंक फूड खायला आवडते, परंतु पीरियड्सच्या काळात महिलांनी ते अजिबात खाऊ नये कारण यामुळे चिडचिड जास्त होते, त्यांना असे पदार्थ खावेसे वाटतात, पण स्वतःला समजावून सांगा की असे अन्न खाणे टाळा.

5. साबण किंवा जास्त केमिकल साबण वापरू नका

जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तेव्हा तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला वास येतो, म्हणून बऱ्याच महिला तेथे साबण लावतात, परंतु हे लक्षात ठेवा की त्या भागात जास्त घासू नका, तसेच जास्त केमिकल वाले प्रोडक्ट वापरु नका , त्यामुळे तेथील कोरडेपणा वाढू शकतो, तसेच खाज सुटण्याच्या देखील समस्या उद्भवू लागतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)