मुंबई : अंडी हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्यापैकी बरेच लोकं हे अंडी खातात. काही लोकं वजन वाढवण्यासाठी तर काही लोकं हेल्थी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी अंडी खाता. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का, की दिवसभरात किती अंडी खाणं तुमच्या शरीसाठी फायदेशीर आहे? अंड खाण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहे. त्यामुळे तुम्ही ते जर जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीरातचे नुकसान होऊ शकते.
अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी आणि इतर अँटी ऑक्साईड्स सारखे अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत, आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की, एका दिवसात किती अंडी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहेत.
जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, कारण अंड्याच्या मध्यभागी भरपूर कोलेस्ट्रॉल असते. एका अंड्यातील पिवळ बलकमध्ये सुमारे 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि दररोज 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जाणं चांगलं नाही.
पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, आहारातून खाल्लेले कोलेस्टेरॉल शरीरातील वाईट आणि चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकत नाही, ज्यामुळे चरबीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल अधिक वाढते.
एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती अंडी खावीत याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे उत्तर देणे तसे कठीण आहे, कारण ते प्रत्येक व्यक्तीवर आणि त्याच्या शरीर आणि वजनावरती अवलंबून असते. कारण प्रत्येकाचे आरोग्य वेगळे असते.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीचे आरोग्य सरासरी आहे. ती व्यक्ती आठवड्यातून 7 अंडी खाऊ शकते, परंतु जर तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या नसतील, तर तुम्ही एका दिवसात सुमारे 3 अंडी खाऊ शकता.
अंडी पौष्टिक असतात पण याचा अर्थ असा नाही की, तुमच्या शरीराला हवी तेवढी अंडी खावीत. उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे अतिसाराची समस्या देखील होऊ शकते.
विशेषत: लहान मुलांना अंड देताना देखील याचा विचार करावा, म्हणून आपण नियंत्रणासह अंड्याचे सेवन केले पाहिजे.