गांजाची नशा किती वेळ राहते?, शास्त्रज्ञांच्या संशोधनात मोठी माहिती समोर

गांजाची नशा करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी, एकदा जरूर वाचा

Updated: Oct 15, 2022, 08:47 PM IST
गांजाची नशा किती वेळ राहते?, शास्त्रज्ञांच्या संशोधनात मोठी माहिती समोर  title=

What Are Marijuana Effects : आपल्या देशांमध्यं गांजाचं सेवन करण्यास आणि तो बाळगण्यासही बंदी आहे. गांजाची लावली तरी तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जगभरातील अनेक देशांमध्येही गांजा बाळगण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र गांजाची नशी कितीवेळ राहू शकते याबाबत शास्त्रज्ञांनी मोठं संशोधन केलं आहे. (What Are Marijuana Effects Health News)

गांजाला मारिजुआना असंही म्हणतात. गांजाचं नशेचा परिणाम माणसाप्रमाणे त्यावर होतो म्हणजे त्या माणासाचा आहार आरोग्य कसा आहे यानुसार त्याच्यावर परिणाम होतो. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील सायकोफार्माकोलॉजिस्ट लेन मॅकक्रेगर यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीने गांजाचे सेवन केले तर त्याच्या शरीरात टेट्राहाइड्रोकानाबिनॉल (THC) नावाचे रसायन अनेक आठवड्यांपर्यंत असते. हे रसायन भांगात असते. हे असे रसायन आहे ज्यामुळे माणूस नशा होतो. हे रसायन माणसाला काही तास नशेत ठेवू शकत असलं, तरी शरीरात ते दीर्घकाळ राहतं.

80 विविध प्रकारच्या अभ्यासांचं विश्लेषण केल्यानंतर, शास्त्रज्ञांना आढळले की गांजाची नशा 3 ते 10 तासांपर्यंत टिकतो. सिडनी युनिव्हर्सिटीचे पोषणतज्ञ डॅनियल मॅककार्टनी, जे संशोधनाचे नेतृत्व करत आहेत, म्हणतात की गांजाचा उच्च डोस एखाद्याला जास्तीत जास्त 10 तास नशा ठेवू शकतो. 

न्यूरोसायन्स अँड बायोबिहेविअरल रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे सूचित होते की काही लोक जे दररोज गांजाचं सेवन करतात ते नशेत असताना त्यांचे काम करण्यास सक्षम असतात. त्यामुळे, गांजा किती काळ एखाद्याला नशेत ठेवू शकते हे सांगणे थोडे कठीण आहे, तरीही त्याचा प्रभाव किमान 5 तास राहतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)