सकाळी चहासोबत काय खाताय? या गोष्टी टाळा नाहीतर वजन वाढेल!

ब्रेकफास्टमध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. 

Updated: Feb 20, 2022, 09:01 AM IST
सकाळी चहासोबत काय खाताय? या गोष्टी टाळा नाहीतर वजन वाढेल! title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. मात्र जोपर्यंत तुम्ही तुमचं डाएट सुधारत नाही तोवर तुमच्या वजनात घट होणार नाही. अनेकदा आपण हीच चूक करतो. आणि याचमुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढत जातं. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रेकफास्टपासून सुरुवात करावी लागेल.

ब्रेकफास्टमध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच चहासोबत खाली दिलेल्या पदार्थांचा वापर करू नका

चहासोबत कुकीज

सकाळी चहासोबत बिस्किट खाण्याची अनेकांना सवय असते. असं केल्याने लोकं त्यांची भूक भागवतात. मात्र यामुळे बेली फॅट वाढण्यास मदत होते.

नमकीन खाणं टाळा

चहासोबत चिवडा किंवा शेव खाणं अनेकांना पसंत असतं. मात्र हे पदार्थ तळलेले असतात. ज्यामध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं. म्हणून हे चहासोबत खाणं टाळावं.

नूडल्स

काही लोकं ब्रेकफास्टमध्ये नूडल्स खाणं पसंत करतात. नूडल्य चवीसाठी उत्कृष्ट लागतात, मात्र हे हेल्दी ब्रेकफास्ट मानला जात नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला नूडल्स खाणं टाळा