चुकूनंही 'या' 3 ड्रिंक्ससोबत औषधं घेऊ नका; आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधं घेऊ नयेत.

Updated: May 4, 2022, 03:21 PM IST
चुकूनंही 'या' 3 ड्रिंक्ससोबत औषधं घेऊ नका; आरोग्यासाठी ठरेल धोकादायक title=

मुंबई : तुम्ही औषध कशासोबत घेता? यावर अनेकांचं उत्तर हे पाणी असेल. मात्र काहीजण दुधासोबत देखील औषधं घेतात. मात्र तुम्ही कधी औषधांच्या मागे लिहिली असलेली माहिती वाचलीये का? या माहितीमध्ये औषधं कशी घेतली पाहिजेत याचा उल्लेख करण्यात आलेला असतो. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, असे काही डिंक्स असतात ज्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारच्या औषधांचं सेवन करू नये. असं केल्याने औषधं विरघळण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. सऊदी फार्मास्युटिकल जर्नलमध्ये पब्लिश केलेल्या एक अहवालानुसार, काही ड्रिंक्ससोबत औषधं घेतल्यानंतरच्या प्रभावांची माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधं घेऊ नयेत. 

कॉफी

कॅफेनसोबत औषधांचं सेवन करणं तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतं. स्टडीमध्ये सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही गरम ड्रिंकसोबत औषध घेतल्यास ते डिसॉव्ह होण्यास अधिक वेळ लागू शकतो. ज्याचा अर्थ गरम ड्रिंकसोबत तुम्ही औषधांचं सेवन करू शकत नाही. 

ऑरेंज ज्यूस

सकाळचा नाश्ता करताना अनेकजण ऑरेंज ज्यूस पितात आणि याचवेळी ते औषधांचंही सेवन करतात. मात्र अभ्यासात नमूद केल्यानुसार, ऑरेंज ज्यूससोबत औषध घेतल्याने त्याच्या डिसॉल्व्ह म्हणजेच विरघळण्याचा वे वाढतो. त्याचसोबत व्हिटॅमीन सीसोबत औषद घेणं नुकसानदायक ठरू शकतं. 

ताक

दूध किंवा ताकासोबत औषध घेणं चुकीचं मानलं जातं. ताकामुळे औषधाचं शोषण आणि विघटन प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे रूग्णांनी शक्यतो पाण्यासोबतच औषधांचं सेवन केलं पाहिजे.