मुंबई : गेल्या 2 वर्षात कोरोनाने सर्व जगात हाहाकार माजवला आहे. कोविड-19 चे नवनवीन रूपे या वर्षांमध्ये समोर आले आहेत. त्यानंतर यावरती लसीकरणाचा पर्याय समोर आला. परंतु कोरोनाच्या बदलत्या प्रकारांवरती ते पूर्णपणे काम करत नसल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाच्या बहुतांश घटनांमध्ये रुग्णाला फक्त सर्दी, खोकला, ताप आणि फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोरोनावर नेमका उपचार सापडलेला नाही, त्यामुळेच डॉक्टर आतापर्यंत केवळ कोरोनाच्या लक्षणांच्या आधारे उपचार करत आहेत.
कोरोनाच्या या काळात सर्दी, ताप असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोक औषधांचा प्रचंड वापर करत आहेत. लोक डोलो-650 औषधाचा ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी सारख्या आजारांसाठी करु लागले आहेत.
परंतु तुम्हाला हे माहित आहे का की? इतर औषधांप्रमाणे डोलो-650 चे दुष्परिणाम देखील रुग्णांवर दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा या गोळ्या घेता तेव्हा त्या वैद्यकीय सल्ल्यानेच घ्या.
डोलो-650 मध्ये पॅरासिटामॉल असते जे ताप कमी करण्यास मदत करते. कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप हेही एक प्रमुख लक्षण आहे. यासोबत डोलो-650 डोकेदुखी, दातदुखी, पाठदुखी,स्नायु दुखणे यांवरही आरामदायी आहे. म्हणूनच हे औषध कोणताही विचार न करता वापरले जात आहे. हे औषध वापरल्यानंतर, ते मेंदूला पाठवलेले पॅन सिग्नल कमी करते, ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो.
या औषधाचा वापर केल्याने आपल्या शरीरात उत्सर्जित होणाऱ्या रासायनिक प्रोस्टॅग्लॅंडिनला देखील प्रतिबंध होतो, ज्यामुळे वेदना वाढतात आणि शरीराचे तापमान वाढते.
Dolo-650 मुळे हे दुष्परिणाम होऊ शकतात
1. मळमळ
2. लो ब्लड प्रेशर
3. चक्कर येणे
4. कमकुवत वाटणे
5. जास्त झोप येणे
6. अस्वस्थ वाटणे
7. बद्धकोष्ठता
8. बेहोश होणे
9. कोरडे तोंड
10. UTI
1. हृदयाचे ठोके कमी होणे
2. व्होकल कॉर्ड्सची सूज
3. फुफ्फुसांचे संक्रमण
4. श्वास घेताना त्रास
5. नर्वस सिस्टम प्रभावित
6. हृदयाचे ठोके वाढणे