उंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा

आज आपण जोडप्यात असलेल्या उंचीचा त्यांच्या विवाहित जीवनावर काही परिणाम होतो का? हे या बातमीतून जाणून घेणार आहोत... 

Updated: Sep 28, 2022, 09:57 PM IST
उंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा title=
Does height affect married life See what has been revealed in the research NZ

The Best Couple Combo : आपण जेव्हा एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा आपण फक्त त्या व्यक्तीचे मन पाहतो. पण समाजात प्रेमाखातर वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यातली नावाजलेली संकल्पना म्हणजे 'प्रेम हे आधळं असतं'. ही संकल्पना त्या जोडप्यांच्या शरीर रचनेप्रमाणे वापरली जाते. 

जसं की कोणी वयाने लहान किंवा मोठं असेल, दिसायला दोघांपैकी एखादी व्यक्ती दमदार नसेल अशा वेळेस लोक सर्रास या संकल्पनेचा वापर करतात. तसाच एक समज जोडप्यांतील उंचीला घेऊन असतो. आज आपण जोडप्यात असलेल्या उंचीचा त्यांच्या विवाहित जीवनावर काही परिणाम होतो का? हे या बातमीतून जाणून घेणार आहोत... (Does height affect married life See what has been revealed in the research NZ)

रिसर्च काय म्हणतो...
रिसर्च मध्ये सांगितले जाते की, जोडप्याच्या उंचीत तफावत असल्यास ते नातं दिर्घकाळ टिकते. कारण त्यांच्यात तितकाच समजूतदारपणा ही पाहायला मिळतो. शक्यतो मुलांची उंची ही जर मुलींपेक्षा अधिक असल्यास या जोडप्यांमध्ये चांगलाच समतोल पाहायला मिळतो. 

7,850 इतक्या महिलांचा सर्वे केल्यानंतर असे आढळले की, त्या महिला त्यांच्यापेक्षा अधिक उंच असलेल्या पुरुषांसोबत खूश आहेत. ज्या जोडप्यांच्या वयात उंचीचा फारसा फरक जाणवत नाही यांच्या तुलनेत या महिलांचे विवाहित जीवन अधिक सुखकर असते. 

आणखी वाचा - Arranged Marriage करण्याआधी 'या' 5 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप अटळ

त्या सर्वेत महिलांनी सांगितले की, पुरुषांच्या उंचीवर ही महिला आकर्षित होतात. महिलांना देखणा, हुशार, स्मार्ट  आणि उंच पुरुषांमध्ये चांगलाच रस असतो. उंच असणारे पुरुष हे बुद्धीमान ही असतात. त्यांच्या उंचीमुळे त्यांचे व्यक्तीमत्तव देखील खूलून दिसते. त्यांनी घातलेला कोणताही पोषाख हा रुबाबदार दिसतो. 

लग्न करताना सगळेच लोक रंगरुप, उंची शक्यतो नाही पाहत. पाहिलं जातं तर त्या व्यक्तीचे मन, स्वभाव आणि समजूतदारपणा. खऱ्या प्रेमात रंगरुप, उंची याला फारसं महत्त्व नाही. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)