तुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा

आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये, पण...

Updated: Jun 13, 2022, 09:51 PM IST
तुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा title=

मुंबई : सनातन धर्मात अशा अनेक परंपरा आहेत, ज्या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. त्यांपैकी काही आजही पाळल्या जात आहेत. या परंपरांमागे काही वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणं असतात. त्यामुळे आपले वडीलधारी माणसं आपल्याला हे असं कर किंवा तस कर असे सल्ले देत असतात. परंतु या गोष्टी अशाच का केल्या जातात? यामागाचं कारण आपल्यापैकी बहुतेकांना ठावूक नसतं. त्यांपैकी एक परंपरा म्हणजे भाकरी किंवा चपाती मोजून न बनवणे.

हो, आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये किंवा शिळं अन्न खावं लागू नये. परंतु वास्तुशास्त्रात असं करणं चुकीचं मानलं जातं.

आजच्या काळात न्यूक्लियर फॅमिली प्रमोट केली जात आहे, त्यामुळे सदस्य कमी असल्याने मोजून चपात्या बनवल्या जात आहेत. परंतु धार्मिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे ज्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

पूर्वीच्या काळी चपाती बनवताना एक रोटी गायीची आणि एक रोटी कुत्र्याची असायची. त्याशिवाय पाहुण्यांसाठी दोन चपात्या जास्तीच्या बनवल्या जायच्या. पण आजच्या काळात ही परंपरा संपुष्टात आली आहे.

वैज्ञानिक कारण

मोजून चपात्या बनवल्यावर उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे शिळ्या पिठाची चपाती बनवू नये. जेवढं पीठ मिळलं गेलं आहे, त्या संपूर्ण पीठाच्या चपात्या बनवाव्यात.

धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे

चपातीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी आहे असे मानले जाते. उरलेल्या पिठात जेव्हा जीवाणू येतात तेव्हा त्याचा संबंध राहूशी येतो. ही चपाती कुत्र्याला खायला द्यायला हवी, पण तसे न करता आपण स्वतः त्या शिळ्या पिठाची चपाती खातो. परंतु यामुळे भांडणाची परिस्थिती निर्माण होते आणि घरातील शांतता भंग पावते.

त्यामुळे जर तुन्हाला घरातील भांडण आणि दुरावा टाळायचा असेल, तर मोजून चपाती बनवू नका. नेहमी गायीची एक चपाती आणि कुत्र्याची एक चपाती बनवा, याशिवाय पाहुण्यांसाठी दोन चपात्या जास्तीच्या करुन ठेवा. वाटल्यास त्या नंतर एखाद्या प्राण्याला द्या, यामुळे पुण्य देखील लाभते.