Belly Fat कमी करण्यासाठी मेहनत करणं सोडा, तर असं कमी करा सुटलेलं पोटं

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का? 

Updated: Jan 10, 2023, 07:21 PM IST
Belly Fat कमी करण्यासाठी मेहनत करणं सोडा, तर असं कमी करा सुटलेलं पोटं title=

Belly Fat loss : चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (wrong diet) यामुळे आजकाल लठ्ठपणाची (Obesity) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही पोटावर चरबी (Belly Fat) वाढणं ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येतेय. पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला जास्त मेहनत न करताही Belly Fat कसं कमी करू शकता, याची माहिती देणार आहोत.

वरील गोष्ट वाचून कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र तुमच्या दररोजच्या जीवनात 3 उपयांचा वापर केल्याने मेहनत न करताही तुम्ही बेली फॅट घटवू शकता. पहा हे 3 उपाय कोणते.

कॅफेनचं सेवन 

कॅफेनचं अधिक प्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानलं जात असलं तरी, काही अभ्यासातून कॅफेन पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, असं समोर आलंय. तज्ज्ञांना आढळलं की, कॅफीन चयापचय उत्तेजित करण्यास मदत करतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते आणि वजनंही कमी होतं. 

गरम पाणी आणि लिंबाचा रस (Warm water Lime juice)

बेली फॅट मुक्त होण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. चरबी कमी करण्यासोबतच कॅलरी बर्न करण्यासाठीही हे पाणी खूप उपयुक्त मानलं जातं. नियमितपणे रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन करण्याची सवय लावा.

पुरेसं पाणी प्या (Water Intake)

दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय तुमच्यासाठी फायदेशीर मानली जाते. शरीराचं एकूण वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावणं फायदेशीर ठरतं. अभ्यासात असं समोर आलंय की, कमी कॅलरी असलेल्या डाएटचं पालन करत दिवसभरात 4-5 लिटर पाणी प्यायलं तर वजन कमी होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते.