Chakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा

संपूर्ण देशभरात Diwali च्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे. 

Updated: Oct 15, 2022, 02:28 PM IST
Chakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा  title=
Diwali 2022 recipe what is the right way to make crunchy and crispy chakli

Diwali 2022 : संपूर्ण देशभरात दिपावलीच्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा (diwali faral), भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे. असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय? मागच्या वर्षी चकल्या तेलात सोडल्या आणि त्या फसल्या.... असं म्हणऱ्यांचं दु:ख ज्यांच्या चकल्या फसल्या आहेत त्यांनाच कळू शकतं. 

तुम्ही अद्यापही दिवाळीचा (Diwali) फराळ सुरु केला नसेल आणि त्या जगात भारीच झाल्या पाहिजेत असं वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. चकल्या बनवण्यासाठीसुद्धा काही मुद्दे, योग्य रेसिपी वापरणं कधीही फायद्याचं. 

अधिक वाचा : Grih Pravesh : नव्या घरात प्रवेश करताना नेमकं काय लक्षात ठेवावं? पाहा ज्योतिषविद्या काय सांगते

चकली बनवण्याची कृती- (chakli recipe )
- 3 कप तांदळाचं पीठ 
- 1 कप भाजकी चणाडाळ
- 1/4 वाटी बेसन 
- 2 चमचे सफेद तीळ 
- 1 चमचा जीरं
- ½ चमचा ओवा
- ½ चमचा हिंग 
- ½ चमचा हळद 
- 1.5 चमचा काश्मिरी लाल तिखट
- मीठ चवीनुसार 
- 4 टेबल स्पून तूप किंवा तेल 
- 2.25 गरम पाणी (आवश्यकतेनुसार)

- कृती 

एका मोठ्या भांड्यात सर्व सुकं साहित्य (पीठ, मसाले, तेल, मीठ, तीळ, ओवा वगैरे) एकत्र करुन घ्या. आता गरजेनुसार गरम पाणी घेऊन पिठाचा गोळा मळून घ्या. 5-10 मिनिटं हा गोळा तसाच राहूद्या. यानंतर पुन्हा एकदा हा गोळा हातानं जोर देऊन मळून घ्या. पुढे चकलीच्या यंत्राच्या सहाय्यानं नेहमीप्रमाणं चकल्या पाडून त्या कडकडीत तापलेल्या तेलात सोडा. 

अधिक वाचा : धनत्रयोदशीला धणे का खरेदी करावेत? एका क्लिकवर पाहा या प्रश्नाचं उत्तर

चकली कुरकुरीत होण्यासाठी हे लक्षात ठेवा... 
- तांदळाचं पीठ अगदी बारीक दळलं आहे यावर लक्ष द्या. 
- चकलीमध्ये तुम्ही बेसनऐवजी मैदाही वापरु शकता. 
- चकलीसाठी मध्यम- चिकट पीठ मळा. पीठ एकदम मऊ मळू नका. पीठ मळतानाच त्याच्यामध्ये गरम पाणी वापरा. 
- चकली मध्यम आचेवरच तळा. मोठ्या आचेवर चकली तळू नका. अन्यथा त्या आतून नरम राहतील. मंद आचेवर तळल्यास त्या जास्त तेल शोषून घेतील. त्यामुळे चकली तळताना ही गोष्ट लक्षात ठेवा. 
- चकल्या तळून तयार झाल्यानंतर त्या थंड करा आणि एका घट्ट झाकणाच्या हवाबंद डब्यात ठेवून द्या.